मानिनी

----

वेचताना भाव माझे भावना बेजार झाली

गुंफले ओळीत तेव्हा लेखणी गुलजार झाली।


या जगाचे शोधले मी  वाटलेले रंग सारे 

रेखता मी कुंचल्यानी,चिंतणे साकार झाली।


नाचताना स्वैर झाले गुंतलेले पाय माझे

पाहुनी आवेग माझा वेदना लाचार झाली


वाकळी काळोखलेल्या फेकल्या गुंडाळलेल्या

ओढले मी काजवे अन ओढणी भरजार झाली।


ढाळलेली आसवे मोत्यांपरी मी माळली अन    

चिलखते शृंगारुनी ही 'मानिनी' तलवार झाली।।

-------------------

Marathi Poem by Manini Mahadik : 111732694

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now