" पिंडी  ते ब्रम्हांडी "
                   -----------------------------मच्छिंद्र माळी औ.बाद "                                                                                     .       हा मानवी देह (इश्वराने) पंचमहाभूतापासुन बनलेला आहे ती पंचमहा भूते म्हणजे पृथ्वी , आप , तेज, वायु व आकाश अशा पंचमहाभूतांचा मेळ म्हणजे हा देह होय.हे विश्व म्हणजेच ब्रम्हांड हे देखील महाभूतांचा प्रचंड संयमित असा महामेळच होय. म्हणुनच " पिंडी ते बम्हांडी "  असे म्हणतात.
        देव शोधण्यासाठी पहील भेदमुक्त होऊन सकाळी ४ते ७या वेळात स्वतःच्या देहात  दडून बसलेल्या देवाला भेटा शिव पासून सोःह ध्वनी घेऊन जाईल सद्गुरु चरणी ओळख लागेल अनेक जन्मांची जे बाहेर तेच देहात दडले ब्रम्हांड त्या मन धारण करती मायावी रुपे अनेक ज्या ब्रम्हांडात तु रमतो तुच त्याचा मालक आहेस उदा मोबाईल टीव्ही रेल्वे विमान लाईट ही सर्व मानव निर्मित ब्रम्हांड कोणाला कोणत्या ब्रम्हांडाचे मालक बनायचे हे तुच ठरव. तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तुच तुझा शिष्य !!! तुच तुझा गुरु !!! नाक कान डोळा मुख हेच वेदांचे प्रणेते ! बोध यांच्या कडुन घ्यावा मन डोळ्यातून पडते घराबाहेर. नाना समस्या घेऊन येते !!! त्या मनाला  भक्तीला लावा. सोःह नामाचे तिर्थ महान या संगमावरती रोज अंधोळ करा. आणि मुक्त व्हावे दुःख दारिद्रयातून!!! सुखाचे दार खुले ठेवले रात्रंदिन !   शिवाने (महादेवाने) सोःह मार्ग दाविला. अनुभवातून  रात्रनंदिवस दिवस खुले ठेविले. सोःह नामाचे दार तुझ्या करीता पण तु हरपून गेलास मनाच्या मायानगरीत. कधी सापडेल तुला व्दार श्रीहरीचे ?  त्या सद्गुरु चरणी धाव मानवा  कळेल खरा देव जगात कोण ?  तुच ब्रम्ह बनशिल सामर्थ्यवान तूच आहेस तुझी ओळख तु विसला म्हणुन तुला दुःखाची प्राप्ती होते. त्याच्या ओळखीत राहुन कार्य कर तुच देव होऊन जाशिल !!!रात्र भर माळ जपुन काम सैतानाचे करशील तर कधी सापडणार मार्ग प्रगतीचा ? भेदभाव करुन माणुस माणसाला गिळायला निघाला!!!जाती धर्म ही पैश्यामुळे घडवली नाहक अभिमान बाळगु नको. हा विचार दुःखाचा बाबांनो विचारनं दुःख पेरतो क्षणाक्षणाला मगं सांगा सुख कोठून उगवणार ?  जैसे  त्याचे कर्म!!! तैसे फळ देतो रे ईश्वर !!!पैशाची किंमत दुःख आहे पैश्याने सुख मिळत नाही उगाच का धावतो त्याच्या मागे ? अशी माणसं अनंत जन्म या सृष्टित दुःख भोगतात. तो श्रीमंत असला तरी त्याला सुख मिळत नाही एखाद्याला तो गरीब असला तरी सर्व सुखे भोगतो !!!देवाला भेटायला कोणाच्या ओळखीची गरज नाही. सद्गुरु पाठी राखा अनंते जन्मे वेळ आल्यावर स्वयम् भेटती घरा !!! ओळख सांगून बोध देई मनुष्याच्या रुपांत तोच देव जाणं 
                ******        *******         *******

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111697590

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now