नाना पाटेकर यांचं "कैसे बताऊ मै तुम्हे तुम मेरे लिये कोन हो" हे किती अप्रतिम बोल आहेत. पण बोल जरी नानांचे असले तरी ते लेखकाचं कर्तृत्व आहे. म्हणजे शब्दशः व्यक्तीच वर्णन कसं करावं याचं उचित आणि अगदी पद्धशीर उदाहरण आहे. म्हणजे किती ते सुरेख आणि किती ते मनाला भावणारे बोल आहेत. गहण्य विचार, स्वतःचं दुखः आणि त्यात लपलेली लेखकाची त्या व्यक्तीसाठीची भावना आणि प्रेम. एखाद्याच्या निष्ठुर झालेल्या हृदयाला सुद्धा प्रेमाचा पाझर फुटेल असे ते शब्द आहेत. कधी कधी वाटतं तेच जर नानांच्या जागी त्याच लेखकाने ते बोल बोलले असते तर अजून किती अप्रतिम वर्णन झाल असत कारण बोल आणि त्याचे तमाम दुःख, भावना ह्या नदीवरच धरण फुटाव अगदी तस बेफांपणे ते अजून खोलवर ते हृदयात भिनले असते. कारण लेखकाच दुःख आणि त्या व्यक्तीसाठीची आपुलकी, प्रेम ह्यांनी त्याला वेगळीच कलाटणी दिली असती. असो आवाज कोणाचा का असेना निदान अशी सुंदर रचना ऐकण्याच भाग्य लाभलं तेवढं पुरे झाल.

Marathi Whatsapp-Status by Ajay Shelke : 111600581

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now