कुणी एक तापस
गुरु स्वराज्यसूर्याचा
आनंदवनभुवनाची
स्वप्ने पाहतो साचा!
हाती घेऊन दिवटी
गोंधळ अंबेचा मांडतो
दुष्टां संहारण्याला
हाक दुर्गेला मारतो!
सजलेला सह्याद्री
पाना-फुलात हासतो
अंबेच्या आशीर्वादे
योगी मनी सुखावतो!

-Aaryaa Joshi

Marathi Religious by Aaryaa Joshi : 111594536

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now