जस श्वासाला गरज असते हवेची ना की ती दिसण्याची.
त्याच प्रमाणे प्रेमात दोघांना गरज असते एकमेकांच्या प्रेमाची.
पण जेव्हा त्या निथळ नात्यात खोट, अहंकार, लपवाछपवी या सारख्यांचा प्रवेश होतो तेव्हा नात्याला कर्करोग झाला अस समजण्यास हरकत नाही. जसं कर्करोग हळू हळू रोग्यास मृत्यूच्या छायेत घेऊन जातो त्याच प्रमाणे नात्याचा सुद्धा शेवटाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. कारण समोरचा खोट बोलत आहे, लपवाछपवी करतो आहे, वागण्याबोण्यात झालेला फरक हा त्याला दिसून येतो. पण त्याला आशा असते की चंद्राला लागलेल्या ग्रहणा प्रमाणे समोरच्याला लागलेले हे ग्रहण सुटेल. पण त्याचे वाढते ग्रहण पाहून समोरचा त्या कायम स्वरुपी लागलेल्या ग्रहणाच्या अंधारातून एकटाच बाहेर येतो. पण त्याच्या मनात त्या ग्रहणाची भीती निर्माण होते ती कायम स्वरुपी.

Marathi Whatsapp-Status by Ajay Shelke : 111588130

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now