#####good morning !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद !
" साधना मार्ग "

*साधनेच्या वेळी चित्ता मध्ये होणाऱ्या सर्व क्रिया शक्तीच्याद्वारा होतात.*

साधकाचा प्रयत्न वा पुरषार्थ यामध्ये नसतो. साधकाच्या मानसिक इच्छांपेक्षा स्वतंत्र रीतीने ही क्रियाशक्ती संस्करांच्या आधारे सर्व योगप्रक्रिया घडवीत असते. यामुळे साधकाच्या चित्तात क्रमशः द्रष्टाभाव येत जातो. वस्तुतः त्यावेळी अंतःकरणात निर्माण होणाऱ्या सर्व क्रियाच् नामस्मरण,जपस्वरूप असतात.त्यामुळे शक्तिजागृती नंतर कर्तुत्वाभिमान यूक्त नामस्मरण,जपसाधना विहित नाही. साधक जेंव्हा असे काही प्रयत्नपूर्वक करु लागतो,तेंव्हा साधनेच्या कालातील शक्तींच्या
आवेगास प्रतिबंध निर्माण होतो.साधक पूर्वस्थितीत येतो. संस्कार क्षयाऐवजी नविन संस्कारसंचय घड़तो.म्हणून साधनेच्या काळात कोणत्याही स्वप्रयत्नपूर्वक जप,भजन,मंत्रसाधना,नामस्मरण वर्ज्य आहे.
अर्थात प्रत्यक्ष साधनकालात शक्तीच्या आंतरिक आवेगातून काही नामस्मरण,जप,मंत्रोच्चार घड़तो,त्याची योग्यता वेगळी आहे.हे सर्व शक्तीच्या आंतरिक स्फुरणाने उत्तेजित झालेले पूर्वसंस्कारांचे प्रगटीकरण असते,प्राणायाम,आसन, बंध, मुद्रा अदि हठयोग प्रक्रिया प्रमाणेच जप,मंत्रसाधना,नामस्मरण आदि मंत्रयोगात्मक प्रक्रिया ही 'आतून' घड़तात. तिथे स्वप्रयत्न नसतो. अश्या वेळी दिव्यशक्तीच्या स्फुरणाने अश्या ज्या प्रक्रिया घड़तील,जे संस्कार प्रकट होतील,ते साक्षीभावाने पाहणे,अनुभवणे महत्वाचे आहे.शक्तीच्या आश्रयाने घडणाऱ्या या व अश्या सर्व प्रक्रियांच्या संधर्भात साक्षीभाव,समर्पणभाव हा शक्तिपात साधनेत महत्वाचा आहे.
काही साधकांना साधनाकाळात गुरुप्रदत्त मंत्रजप करण्याची प्रेरणा होते. वस्तुतः क्रियाशक्तीची क्रियाशीलता हाच मंत्र जप आहे. त्यामुळे गुरुप्रदत्त मंत्रही या क्रियावेगात बळाने घुसडवणे हानिकारक आहे. मंत्राचे आलंबन सुटून क्रियाप्रारंभ होणे हे मंत्रसाधनेचे वास्तविक लक्ष्य आहे.या क्रियायोगातच साधकाचे कल्याण आहे.

स्वामीजी म्हणतात,
"शक्तिपात के मार्ग में कई महात्मा मंत्ररहित दीक्षा देते है। किन्तु हमारा विचार मंत्रसहित दीक्षा के पक्ष में है;क्योंकि शिष्यको मंत्र का अवलंब रहता है।अतः हम मंत्र सहित दिक्षा को कही अधिक उपयुक्त समजते है। मंत्र रहित दीक्षा में कोई सम्बल न रहनेसे साधक निराश्रितसा रह जाता है।"

बैठक साधने व्यतिरिक्त अन्य काळात जर साधका कड़े गुरुप्रदत्त मंत्र असेल तर सोय, स्थल काल याची अनुकूलता असताना,किंवा सर्व व्यवहार चालू असताना साधक त्या गुरुप्रदत्त मंत्राचा जप करु शकतो.तो शक्तियुक्त असल्याने पोषक व उपकारक ठरतो.

प.प.श्री स्वामी शिओमतीर्थ महाराज यांच्या लेखाचा मराठी अनुवाद
पंथराज या त्रैमासिकातून...

🙏🙏 🌺 जय गुरुदेव 🌺🙏🙏

●▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬●

*👉 अधिक जानकारी प्राप्त करने के लिये*

यहां क्लिक करें एवं पेज पर लाइक बटन दबाएं,

🌞 *~ श्री दत्त संप्रदाय द्वारा ~*🌞

🙏🏻🌹🌻☘🌷🌺🌸🌼💐🙏🏻

https://www.facebook.com/groups/shreedattasampraday/

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111570486

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now