कठीण आहे जगणे वेडे तुझ्याविना
मी रोजच मरतो येथे सांगू अता कुणा (१)
ते फुल गूलाबाचे नव्हते कधीच माझे
उगाच काट्यांनी बोचले पुन्हा पुन्हा (२)
रागात बोललो मी बरेच काही तुजला
अजून आसवे गाळतो, तो प्रसंग जुना (३)
वैफल्यात बरगळतो, असे मुळीच नाही
कळली चुक मजला, माफ कर बाई (४)
#कठीण

Marathi Poem by Suryakant Majalkar : 111524631

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now