जिजाउच्या उदरातून उमलले
 मावळ्यांच्या हृदयात विराजले
 ते शूर राजे शिवराया.

 मराठी माती उधळली
 महाराष्ट्रास  जाग आली
 ते सूर्य राजे शिवराया. 

 तलवारीत भवानी पाहिली
 शाइस्तेखान ची बोटे चिरली
 ते धैर्यवान राजे शिवराया. 

 महाराष्ट्राची आन शान
 मराठी मनाचा अभिमान
 ते प्रजा कनवाळू राजे शिवराया.

 हाती घेतली त्यांनी तलवार
 शत्रूचा केला त्यानी संवार
 ते निडर राजे शिवराया. 

 शत्रूचा उडाला थरकाप
 परी प्रजेसाठी कनवाळू बाप
 ते गुणवान राजे शिवराया.

Marathi Poem by Nandita Dalvi : 111418151

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now