#जन्म
उमलता कळी रुप, व्हावे फुलाचे जन्म घेऊनी नवा, वार्याने डोलावे
वाहुनी नदी रुप, व्हावे सागराचे जन्म घेऊनी नवा, वायाने खळखळावे
मांडता शब्द रुप, व्हावे गीताचे जन्म घेऊनी नवा , मुखाने गुनगुनावे
सजती रंग रुप ,व्हावे इंद्रधनुष्याचे जन्म घेऊनी नवा ,गगनाने सजावे
जागल्या भावना रुप, व्हावे प्रेमाचे जन्म घेऊनी नवा , प्रेमाने जगावे