#काव्योत्सव # प्रेम

अव्यक्त

तिच्याशी रोज बोलायचो
म्हणजे मनातल्या मनात
आणि ती रोज हसायची
फक्त गालातल्या गालात

तीच्या हसण्याची शेती
मनातल्या मनात करणे
दुष्काळात बांधावर
माठाने पाणी भरणे

बांधावरील राबण्याला
तीचे मन नाकारते
अंगकोळी होत गाते
नि दहीभात खाते

खाण्यासाठी जगणे
असे नाकारते मला
अरे शेतकऱ्यांच्या मुला
कशी पेटवेन रे चुला !

चुल पेटवण्याची रीत
प्रेमाच्या किती त-हा
असो तुझे हे जाळणे
मी कुवाराच ब-हा

संजय येरणे. नागभीड. 9404121098

Marathi Poem by Sanjay Yerne : 111160572
Subhash Mandale 4 years ago

मी कुवाराच बरा,खरंच मस्त 👌,

Harish Yerane 5 years ago

अप्रतिमच

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now