नवीन वर्षाची सुरुवात....


‍‍‍वर्ष २०१८ प्रत्येकांसाठी हे वर्ष कसं गेलं असेल हे त्या व्यक्तीलाच माहीत असेल ..पण उद्या पासून प्रत्येक व्यक्ती काही तरी निश्चय करेल ,काहीं संकल्प करेल काही ध्येय असतील की जे काही मी मागच्या वर्षी चुकलो किव्वा काही चांगल्या गोष्टी मुळे पुढे गेलो.. ह्या गोष्टीचा विचार करेल  आणि त्यात ह्या वर्षी काही नवीन उपक्रम करेल..मागच्या वर्षी प्रत्येकाने आपल्या मनात काही नियोजन केले असेल काही संकल्प केले पण ते काही पूर्ण नसतील झाली.. पण हरकत नाही लढत रहा.. एक दिवस नक्की येईल जिथे तुम्ही जिंकलेले असाल... तोच विचार करून योग्य वेळेची वाट बघा.. काहींना २०१८ हे वर्ष खूप कठीण गेलं असेल तर काहींना खूप चांगलं गेलं असेल.. आज सगळं काही विसरून जावा. आणि एका नवीन आयुष्या ला सुरुवात करा.. २०१९ चा प्रत्येक दिवस असा जागा की हा माझा शेवटचा दिवस असेल. आज काल माहीत नाही की आपण किती दिवस जगेल.. करणं खूप जवळच्या व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यात आहेत.. ज्यांना विसरण कठीण आहे.. आपल्या कुटुंबला वेळ द्या.. जे काही प्लॅन असतील ते लिहून ठेवा.. त्या रोज वाचा..कधी ना कधी ते यश नक्कीच मिळेल.दिवस पण तेच असतात पण फक्त जगण्याची कला शिका..प्रत्येक दिवस असा जागा की जसा तुमचा वाढदिवस आहे.. कारण ह्या दिवशी आपण खूप खुश असतो.. कारण तुम्ही जसे वागता जसे राहता तसच आणि तेच तुमच्या बाबतीत घडतं..

तुमच्या यशा साठी आणि येणारे नवीन वर्षा साठी तुम्हाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.. 

सुमित भालेराव..

Marathi Good Morning by Sumit Bhalerao : 111068944

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now