आणि... डॉक्टर काशिनाथ घाणेकर!!!


हा चित्रपट आतापर्यंत बहुतेकांनी सिनेमागृहामध्ये पहिला असेल अथवा त्यासंदर्भातील परीक्षणे वाचली असतील. सध्याच्या वेळी सर्वत्र चर्चेत असलेली ही कलाकृती आहे. त्यामुळेच त्याचे संपूर्ण परीक्षण करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही आहे.


अर्थात, तरीही हा लेख लिहिण्या मागचे कारण म्हणजे सर्व परीक्षणे वाचली, चर्चा ऐकल्या पण काही मुद्दे या सगळ्यातून सुटून गेल्यासारखे वाटतात आणि ते मांडण्याचा मोह आवरत नाही इतकेच...


हा सिनेमा एक उत्तम कलाकृती आहे हे आता सर्वश्रुत आहे, पहिल्या दृश्यापासूनच तो प्रेक्षकांवर एक पकड मिळवतो आणि ती कुठेही ढिली पडू न देता पुढे सरकतो.


मात्र या सिनेमातील जाणवलेले वेगळेपण म्हणजे कथेमधील प्रमणिकपणा. सिनेमाची पटकथा ही 'नाथ हा माझा' या पुस्तकावरून प्रेरित आहे असे समजले. कदाचित त्यामुळेच या सिनेमात काही मते परखड पणे मंडळी आहेत. 

डॉक्टरांच्याकडे एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून बघण्यात आले आहे. त्यांचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, किंवा सिनेमा तिकीटबारीवर चालण्यासाठी नायकामधील गुणदोष लपवण्याचे काम हा सिनेमा कुठे करत नाही किंवा केवळ समाजाला पटतील म्हणून काही वाक्ये नायकाच्या तोंडी देण्यात आलेली नाहीत. 

या सिनेमाचे हे वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही.

 

सिनेमाच्या माध्यमातून डॉक्टरांचा चरित्रपट आपल्यासमोर अलगदपणे उलगडत जातो. त्यांच्या आयुष्यातील, व्यक्तिरेखेतील विविध पैलू आपल्यासमोर उलगडत जातात.

काम मिळण्यासाठी झटणारा अभिनेता, वडिलांच्या तोंडून कौतुक ऐकण्यासाठी तळमणारा एक मुलगा आणि मग यशाच्या शिखरावर पोचलेला एक अभिनेता असा जीवन प्रवास प्रामाणिकपणे मांडण्यात आला आहे. इथपर्यंत प्रामाणिकपणा सगलीकडेकच असतो मात्र चित्रपटाचा प्रवास वेगळा ठरतो तो यापुढे.  

त्या शिखरावर पोचल्यावर समोर येणारी वादळे चाहत्यांच्या मनात टिकून राहण्याचा अट्टाहास, कौतुक ऐकून घेण्याची नशा, त्यामुळे वाढलेला अहंकार, तसेच व्यवसायात निर्माण होणारी स्पर्धा आणि मग ती जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न सगळेच परदर्शीपणे मांडले आहे. हे सगळे करत असताना नायकातील गुणदोष पारदर्शीपणे मांडले जातात, 'प्रेक्षकांचे नायकाविषयी काय मत होईल?' या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कथेची मांडणी केली असल्यामुळे कथेतील प्रामाणिकपणा मनास भिडतो.

अर्थात हे सगळे करत असताना चित्रपटातील रंजकता मुळीच कमी होत नाही, एकूणच डॉक्टरांच्या कथेने परत एकदा प्रेक्षकवर्गाला परत एकदा थिएटरवर खेचून आणले आहे. त्यांवही लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते -

"डॉक्टरांचे नाणे आजही एकदम खणखणीत वाजत आहे.... पिक्चर बनला आहे एकदम टॉप.... एकदम कडकssss....."

Marathi Film-Review by Swapnil Tikhe : 111047314
Swapnil Tikhe 5 years ago

thank yiu aryaa madam...

Aaryaa Joshi 5 years ago

छान.खरच प्रामाणिक चित्रपट आहे

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now