ताण तणाव घातक असतो:अति हाव हा जीवनाचा शत्रू

ताण तणाव हा एक प्रकारच्या गॅस चेंबर सारखे काम करतो. कुक्करच्या शिट्टीने मर्यादित काळ वाफ रोखता येते परंतू त्याची सहनशक्ती संपली की स्फोट होतो. नदीला पूर आला की ती सर्वच नष्ट करीत जाते.जीवनदायिनी जीव घेणारी ठरते. जसा गॅस चेंबरला, सिलेंडरला रेग्युलेटर असतो, कुक्करला जशी शिट्टी असते ,तशी तणावमुक्त करणारे रेग्युलेटर किंवा शिट्टी आपल्या कडे निसर्गाने दिली आहे, परंतू आपण तिचा वापर करत नाही. ताण-तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. कशाचीही वाजवी पेक्षा जास्त चिंता न करणे, ताण कमी करण्यासाठी आपले छंद जोपासणे, नियमित व्यायाम, योगा करणे, आपल्या मित्र मंडळी, नातेवाईक व नातवंडांत रममाण होणे, आपल्या आवडत्या व्यक्तीशी सुसंवाद साधणे, आवडत्या ठिकाणी सहलीस जाणे, यासारखे अनेक उपाय आहेत. आपली सुख, दुःख शेअर करता येतील अशी जीवाभावाची माणसं, मित्र, मैत्रीणी जोडून ठेवावीत. आनंद झाला तर तो खुलेपणाने व्यक्त करता आला पाहिजे, दुःख झाले तर आपल्या हक्काच्या खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडता आले पाहिजे. जीवनात खंबीरपणा आवश्यक आहे परंतू खंबीरपणा म्हणजे दुःख; भावना दडपून ठेवणे नव्हे. खळखळून हसावे व मनसोक्त रडून घ्यावे.ताण आपोआप पळून जाईल.

पैसे जरूर कमवा पण त्यासाठी स्वतःची कुतरओढ करून घेऊ नका. आपल्या गरजा; बडेजाव कमी केला तर आपण कमवित असलेले पैसे पुरून उतरतील. पैसा अफाट कमावला आणि मनाला शांती नसेल, कौटुंबिक सुख नसेल तर त्या संपत्ती व ऐश्वर्याचा काय उपयोग ? पैश्याच्या नादी लागून विविध रोगांना आमंत्रण देऊन आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा, आहे त्यात समाध मानता आले पाहिजे. तरच ताण-तणाव आपल्या जवळपास देखील फिरणार नाहीत व आपले जीवन आनंदी होईल.

Marathi Book-Review by Hari alhat : 111831739

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now