समजू शकलो नाही कधी आम्ही
तुला भीम म्हणून मिरवाव की
नवीन जन्म दिलास म्हणून भिमाई म्हणून पुजाव !
विचारात पडतो जो तो
बाप म्हणून सन्मान करावं की
देव म्हणून काळजात बसवाव !!!

तू महामानव, जीवनदाता बनून
आम्हाला मानव बनवलं !
साऱ्या जगाशी एकटा लढून
शेळी बनून जगणाऱ्या
लेकरांना वाघ बनवलं !

कळलास ज्यांना तू
त्यांनी तुला डोक्यात घेऊन
कृतीत उतरवल !
नाही कळणार कधी त्यांना तू
ज्यांनी तुला फक्त डोक्यावर घेऊन मिरवल !

जातीयता नष्ट तर केलीच
पण अज्ञानाच्या बेडीतून ही
सोडवलसं !
एकाच जन्मी आम्हाला
शंभर जन्मी सुख देऊन गेलास
जेव्हा बुद्धासारखा मार्गदाता
आमच्या कडे सोडून गेलास !

फेडू शकणार नाही कधी
तुमचे हे उपकार !!
हजारो जन्म मिळाले
तरी आम्ही तुमचेच आदर्श जपणार !!!

Marathi Poem by suchitra gaikwad Sadawarte : 111768445

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now