जीवन चक्र.....

सुखाचा उंबरठा ओलांडायला उभा होतो ...
तर समोर दुःख ओवळणीच ताट
घेऊन वाट पाहत होता !

जेव्हा कुटुंबाच्या कुंपणामध्ये होतो ...
तेव्हा तो उडणारा स्वतंत्र पक्षी
मला चिडवत होता ...
आज स्वतंत्र जगभर हुंडतोय
पण आपलेपणाची साथ माझ
जीव रडवेला करत होती..... !

मित्रांच्या घोळक्यात बेधडक
जगत होतो ...
पण रिकामा खिसा निराश करत होता ....
आता खिसा भरलेला होता
पण मित्रांची जागा निराश करत होती ....

जेव्हा हातगाडी वरची पाणीपुरी
डोळ्यातून पाणी आणत होती तेव्हा समोरच फाईव्ह स्टार हॉटेल
मला नकळत खुणावत होत ...
आज हॉटेल मध्ये बसून होतो
पण समोरची हातगाडी
माझ्याकडे बघुन हसताना
दिसत होती ...

एकट आनंदात जगत होतो
आणि माणसांची साथ मला हिणवत होती ...
जेव्हा माणसांची गर्दीमध्ये जाऊन उभा राहिलो ...
तेव्हा एकटेपणा खांद्यावर हात ठेवून आधार देत होता ....

जेव्हा जीवनामध्ये सगळ काही
भरभरून होत..
तेव्हा मरण हवंहवस वाटत होतं!
आज मरण अगदी चहूबाजूंनी मिठी मारून आहे पण
जगण्याची उणीव भासत होती !

Marathi Poem by suchitra gaikwad Sadawarte : 111748704

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now