राजा भोज मोठा दानशुर होता.
त्याची एक सवयहोती की जेव्हा तो दान देण्यासाठी हात समोकरी तेव्हा तो आपली नजर खाली झुकवून घेत
ही बाब सर्वांनाच खटकतअसे
असा कसा हा दानशूर राजा जो दानही देतो आणि ते देतांना त्याला लाजही वाटते
जेव्हा राजा भोजची ही किर्ती संतश्रेष्ठ तुलसीदासांच्या कानी पडली
तेव्हा त्यांनी खालील चार ओळी लिहून त्या राजाला पाठवल्या
ऐसी देनी देन जु
कित सीखे हो सेन।
ज्यों ज्यों कर ऊँचौ करौ
त्यों त्यों नीचे नैन।।
म्हणजे हे राजन आपण हे असलं दान देणं कुठून शिकलात?
जसजसे आपले हात दान देण्यासाठी वर येऊ लागतात तसतशी आपली नजर खाली खाली कां झुकू लागते?
राजा ने जे उत्तर तुलसीदासांना लिहून पाठवलं ते मोठं सुंदर होतं. ज्यांनी ज्यांनी राजाचं हे उत्तर वाचलं ते ते सर्व तर राजाच्या प्रेमातच पडले.
राजाने उत्तरात लिहिलं -
देनहार कोई और है
भेजत जो दिन रैन।
लोग भरम हम पर करैं
तासौं नीचे नैन।।
म्हणजे, देणारा तर तो कोणी दुसराच आहे. तो ईश्वर, तो परमात्मा तोच रात्रंदिवस लोकांना दानधर्म करीत असतो. परंतु लोकांना मात्र वाटत असतं की दानधर्म मी, त्यांचा राजाच करतोय. आणि या विचारानं मला माझीच लाज वाटत असते आणि माझे डोळे आपोआप लवतात.
तोच करतो आणि तोच करवून घेतो तू फक्त निमित्त आहेस, कशाला अभिमान बाळगतोस?

-Hari Alhat

Marathi Quotes by Hari Alhat : 111728625

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now