यमुनेच्या काठी
वाट पाहते दिठी
कुणीतरी!

वार्‍यावर स्वार
रंगीत पदर
फडफडे

काजळ नयनी
श्यामसखा मनी
भावविभोर


पूर्ण चंद्रबिंब
फुललेला कदंब
डोहापाशी

कृष्णकिनारा
सुरेल तारा
छेडितसे!

-Aaryaa Joshi

Marathi Poem by Aaryaa Joshi : 111712089
मच्छिंद्र माळी 3 years ago

आर्या जोशी यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा !

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now