पुन्हा एकदा माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली.. सर्वप्रथम या व्हिडिओला पाहिलं ,त्यावेळेस असं वाटलं की हा व्हिडिओ बहुदा खरा नसावा.. कोणीतरी मुद्दामून शूट केलेला असेल??? पण नाही ही सत्य परिस्थिती आहे, हे अनेक बातम्या व न्यूज चॅनेल मध्ये आल्यानंतर समजलं..!!अहमदाबाद मधील साबरमती नदीच्या रिव्हर फ्रंट वा क वेब्रिज वरून या आयेशा आरिफ खान या महिलेने व्हिडिओ बनवून तसेच आपल्या मृत्युचे कारण सांगून आत्महत्या केली... जाता जाता तिने कोणावरही प्रश्नचिन्ह उभे न करता हसत या जगाचा निरोप घेतला ...आपल्या आयुष्यातील टोकाचा निर्णय घेण्यामागची वेदनादायी कारण ही तिने हसत हसत सांगितलं.. पण हसत हसत सांगताना तिचे डोळे मात्र सगळ्यांनाच तिच्या दुःखाचे सत्य सांगून गेले..कुटुंबियाकडून विश्वास घात झाल्याची वेदना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती..खरंच काय विदारक परिस्थिती आहे...!! आजही हुंड्यासाठी कित्येक जणींना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतं आणि ज्यांना हे सहन झालं नाही त्या या जगाचा निरोप घेतात...✍️✍️💞Archu💞व्हिडिओमध्ये आयशा सांगते की,"माझे नाव आयशा आरिफ खान असून मी जे काही करत आहे तो सर्वस्वी माझा निर्णय आहे त्यासाठी मला कुणीही दबाव टाकलेला नाही..तिच्या नवऱ्याला स्वातंत्र पाहिजे म्हणून असती त्याला कायमचा स्वातंत्र्य देऊन चालली आहे..मी माझ्या देवाला विचारेन कि देवा माझे आई-वडील हे चांगले आहेत माझा मित्रपरिवार देखील तितकाच चांगला आहे पण माझ्याच नशिबात काहीतरी कमी असेल??? मी खूप शांत त्यांनी या जगाचा निरोप घेत आहे.. माझ्यामागे कुणालाही जबाबदार धरू नये.. तसंच कुणीही माझ्यासाठी भांडू नये... मी या वाहणार्‍या हवेसारखे आहे आणि मला तिच्या  सारखेच वाहवत रहायचे आहे...एक गोष्ट मी शिकले एकतर्फी प्रेमातून काही होऊ शकत नाही प्रेम करायचं असेल तर ते दुतर्फा करा नाहीतर त्यातून काही साध्य होत नाही.. काही प्रेम हे अर्धवटच असतात असा निरोप तिने यातून सगळ्यांना दिला.."मी आज खूप खुश आहे कारण मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत ज्यांना ज्यांना मला सांगायचं होतं त्यांना मी सांगितला आहे.. माझा सगळ्यांना सांगून झालं आहे म्हणून तिने निरोप घेतला..आयुष्याचं जुलै 2018 मध्ये आरेफ खान सोबत लग्न झालं होतं..तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा खूप छळ केला होता.. 2018 मध्ये ती आपल्या आई वडिलांच्या घरी गेली होती पण पुन्हा मध्यस्थी करणाऱ्या काही माणसांनी त्यांचे वैवाहिक जीवन पुन्हा एकदा रुळावर आणली होती.. त्यावेळी तिच्या वडिलांनी मुलीच्या सासरच्या मंडळींना दीड लाख रुपये दिले होते.. पण ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे तिच्या सासरच्या मंडळींनी पुन्हा त्रास दिल्याने ती आपल्या माहेरी परत आली होती.. तिच्या सोबत सासरचे पहिल्यासारखं वागायला लागले होते..आणि या सगळ्यांना कंटाळून च तिने आत्महत्या केली...,आज कित्येक महिलांना तडजोड करून आपल्या संसारात जीवन भर त्रास असतानादेखील त्या तडजोडीचा संसार करतात.. आणि ज्यांची सहन शक्ती संपली त्या या जगाचा निरोप घेतात.. पुन्हा एकदा हुंड्यासाठी, एकीचा बळी घेतला...खरंच, माणसाच्या आयुष्यापेक्षा ही इतर कशाला महत्त्व नाही हे अजूनही लोकांना पटत नाही.. का प्रत्येक वेळेस एका सुखी संसारासाठी संपत्ती आडवी येते..??? का तिच्या सन्मानाला ठेच पोहोचवली जाते..??? का प्रत्येक वेळेस तिचेच बलिदान मागितली जाते??? जरी ती खंबीर असली म्हणून तिचा अमर्याद छळ करून तिला हळवे केले जाते???तिचे अस्तित्व तिच्यापासून हिरावून घेताना माणसातील माणुसकी खरंच संपली आहे..!!! आयुष्याचा निर्णय घेताना टोकाची भूमिका घ्यायला, मन धजावत नसलं तरी हे जनसमाज तिला जगून देत नाही!!!!आज ही व्यथा मांडताना डोळ्यातून प्रचंड संताप बाहेर पडत आहे ..लिहिताना हात थरथरत आहेत.. तरीही कित्येकांना या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही हेही एक वेदनादायक सत्य आहे....✍️✍️💞 Archu💞

Marathi Tribute by Archana Rahul Mate Patil : 111669066

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now