मार्गशीर्ष महिन्यातील येणारी मोक्षदा एकादशी आणि त्याच दिवशी येणारी गीताजयंती म्हणजेच एक महान पर्व... या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली होती म्हणजेच भगवंताच्या स्व मुखातून श्रीमद भगवत गीतेचा जन्म झाला आहे.. श्रीमद भगवत गीता हे संपूर्ण ग्रंथाचं सार मानले जाते... भगवद्गीता असा एकमेव महाग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते...👣

भगवंतांनी त्यांच्या प्रिय शिष्याला म्हणजेच अर्जुनाला युद्धाच्यावेळी केलेला उपदेश म्हणजेच गीता होय.. ज्यावेळी महाभारताचे महायुद्ध चालू होते दोन्ही बाजूने महासेना युद्ध करण्यासाठी सज्ज होत्या त्यावेळी अर्जुनाचा सारथी म्हणून आलेले श्रीकृष्ण भगवान त्यांनी अर्जुनाचे मार्गदर्शन करण्यासाठीच त्याला युद्धभूमी च्या मधोमध आणले... आपल्याच सखिया विरुद्ध कसे लढावे आणि हा धर्म आपण का करावा असे म्हणून हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला प्रेरणेचे व स्नेहाचे अगदी मोलाचे असे मार्गदर्शन भगवंतांनी दिले.. संसार रुपी अर्जुनाला साक्षात परब्रम्ह परमेश्वर ईश्वरानेच या संसारातून मुक्तता कशी मिळेल यासाठीच हे परम ज्ञान दिले...कधीकधी प्रवाहाविरुद्ध जाऊनही सत्याची कास धरणाऱ्या अपयश हे मिळते पण त्यासाठी सामोरे जाण्यासाठी खचून न जाता आपण प्रयत्नाची पराकाष्टा करून आपले ध्येय साध्य केले पाहिजे... भगवद्गीते मधून अनेक उपदेश आपल्याला मिळतात... गीतेमधील प्रत्येक श्लोकाचा नवनवीन अर्थ असतो... प्रत्येक शब्द अन शब्द भगवंताच्या मुखातून निघाल्यामुळे पवित्र आहे प्रत्येकाचा विशेष असा अर्थ आहे...👣

श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व वर्णन करणेवास्तविकपणे कोणालाच शक्य नाही हा खूप रहस्यमय असा ग्रंथ आहे खरंतरआतापर्यंत अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या बुद्धी नुसार प्रत्येक श्लोकांचे वेगवेगळे अर्थ मांडलेले आहेत.. शास्त्रज्ञही त्यावर प्रत्येक पैलूंनी विचार करतात.. असा कोणताच प्रश्न नाही की जो भगवत् गीतेतून सुटणार नाही.. भगवद्गीतेमध्ये आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तरा आहे.,.. या ग्रंथाचा सतत अभ्यास करूनही त्याचा थांगपत्ता लागत नाही आता असा महासागर असलेले हे गीता रुपी ज्ञान भगवंतांनी आपल्यासाठी अगदी सहजतेने आपणास सांगितले आहे...👣

आपणही हा अद्वितीय असा ग्रंथ वाचून त्याचा लाभ घ्या.. गीताजयंती आजच असल्यामुळे तिचे महत्त्व शतपटीने वाढते असे समजून तरी आजच्या दिवस गीतेचे पारायण जरूर करा... भगवान श्रीकृष्णाची पूजा करून तसेच मोक्षदा एकादशी चा उपवास करून संपूर्ण दिवसभर आपल्या आराध्य देवतेची पूजा करावी...👣

गीता पाठ पढाने वाले..
गीता पाठ कराने वाले..
गीतारहस्य बताने वाले..
तुमको लाखो प्रणाम...💞

हम तो मूर्ख है ..
तुमको नही भजते..
गीता का पाठ ..
याद नही करते ..
जो पढते है उनको..
हमारा कोटी कोटी प्रणाम..💞

गीता जयंती चा उपक्रम प्रत्येकाने ज्याच्य त्याच्या परीने नक्की करावा,... माझ्या माहेरी आडगाव ला दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मित्रा जयंतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे.. तिथे सर्व भाविक वृंद आणि गीतापठण केलेल्या बंधू-भगिनी एकत्रित होऊन संपूर्ण श्रीमद्भागवत गीता या ग्रंथाचे वाचन करतात भगवंताचे आवाहन करून त्यांची मनोभावे पूजा भजन कीर्तन करून त्याची येतो सांग गता करतात.. मीही नेहमीच गीतेचे पारायण करत असते तुम्ही देखील गीता पारायण करून भगवंताच्या ध्यानात लिन होऊन या आनंदाची अनुभूती घेऊ शकता...

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला वाचून कमेंट करून नक्की कळवा तुमच्या-आमच्या मधील ✍️✍️💕Archu💕

-Archana Rahul Mate Patil

Marathi Motivational by Archana Rahul Mate Patil : 111632720

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now