बसमध्ये मला एक मुलगी दिसली 


बसमध्ये मला एक मुलगी दिसली 

बघून मला खुदकन हसली 

शेजारी माझ्या येऊन बसली 

पाहताच क्षणी मनात बसली 


बसमध्ये रोजच भेटू लागली 

थोड्याच दिवसांत आमची गट्टी जमली 

फोन, व्हाट्सअँप वर चॅटिंग होऊ लागली 

जेवताना आज अचानक मला उचकी लागली 

मला वाटले तिने माझी आठवण काढली 


झोपताना रात्री स्वप्नात ती आली 

लग्नाच्या जोड्यात मला दिसली 

हार गळ्यात घालण्याआधीच हाक आईची आली 

स्वप्नातून माझ्या जाग मला आली 


बस स्टॉप वर माझी बस होती आली

स्वप्नातले तिला सांगायची घाई मला होती झाली

सगळीकडे मी तिला शोधली  

पण आज मात्र ती कोठेच नाही दिसली 

खूप दिवस गेले पण ती नाही आली


एके दिवशी मात्र ती मला दिसली 

नेहमी प्रमाणे ती माझ्या शेजारी येऊन बसली 

पण आज ती काहीच नाही बोलली 

जाताना हातात लग्नाची पत्रिका तिने ठेवली 


कशी नशिबाने माझी गुगली केली 

स्वप्ने माझी सगळी हवेतच विरली 

देवाला मी विचारले तिची आणि माझी भेटच का घडवली 

परत प्रेमात न पाडण्याची शपथ मी खाल्ली 


घरी गेलो तर जेवणाची इच्छा होती मेली 

कळलेच नाही संपूर्ण रात्र

विचारात कशी गेली 

आईच्या हाकेने लक्षात आले

सकाळ होती झाली 


स्टॉप वर आलो तर रोजच्याप्रमाणे बस होती लागली 

बसमध्ये चढून सीट कडे माझ्या नजर मी टाकली 

आज तिथे होती बसली एक नवीन मुलगी  

बघून मला खुद्कन हसली 

बसमध्ये मला एक मुलगी दिसली

Marathi Poem by Jaaved Kulkarni : 111619839

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now