*👴🏼👵🏽Whatsapp चा शाप न जेष्ठांचा ताप.

तर आजचा विषय आहे WhatsApp चे फमिली ग्रुप..!
समस्त चि.सौ.कां.पोरींनो🙋🏼‍♀ तुमच्या मोबाईलमध्ये बघा दोन डेडीकेटेड फमिली ग्रुप असतातच.सासरचा आणि माहेरचा.
पूर्वी जो सासू-सुनेचा प्रत्यक्ष टोमण्यांचा कार्यक्रम असायचा त्यानेही आता एक नवीन रूप घेतलं आहे.
आता होत काय सासरच्या ग्रुपवर जॉईन असलेल्या चुलत,आत्ये,मामे सासवा,नणंद ह्या त्यांच होम ग्राउंड असल्या प्रमाणे बिनधास्त Batting करतात.
तर ह्यांचे सर्वांचे मेसेज मुख्यत्वे असे असतात-
‘सुनबाई तुझ whatsapp चुलीमंदी जाळ’ (असं लिहतांना ह्या स्वतःच whatsapp वर )😆

‘वृद्धाश्रमात एकदा आईला येऊन भेटून जा’(हे त्या मऊ मऊ सोफ्यावर बसून तुझ्यात जीव रंगला,लागीर वैगरे बघतांना फोरवर्ड करत असतात हे गोष्ट विशेष हं!)😄

‘आज काळ मुलांना बोलायला वेळ नाही’

‘लेक असते आईची छाया...’

‘वहिनीबाई भावाला एकदा भेटू दे...(यात त्या डबल टोमणे हाणतात पोरीच्या वतीने सुनेला आणि ग्रुपमध्ये असणार्या स्वतःच्या भावजैला)

‘साब्कुच भुलना माबाप को नै...’ ,

‘साडी गेली जीन्स आली...’

‘घरात कुणीतरी मोठं पाहिजे ..’

ब्ला.. ब्ला... ब्ला...
ही तर झाली सासवांची तऱ्हा तमाम सासरेबुवांचा(आणि वडिलांचा सुद्धा) एक वेगळाच त्रास आहे.
ही मंडळी दर दोन दिवसांनी –

‘सावधान उद्या Equinox आहे,घराबाहेर पडू नका’😱

रात्री बारानंतर cosmic किरणे पृथ्वीवर आदळणार आहे.(ह्या मेसजच्या जनकाने इतक्या वेळा ते आदळवले आहे की विचारता सोय नाही.)⚡⚡🌞🌞

‘नासाचा रीपोर्ट-ढगफुटी होणार आहे’⛈

‘जन गण मन एक नंबर राष्ट्रगीत घोषित’

‘.... सरकार फ्री सायकल वाटत आहे’, .... सरकार फ्री घर वाटत आहे’

‘सावधान मुले पकडणारी टोळी आली आहे’,

’सावधान तुमचा भाजीपाला प्लास्टिकचा आहे.’

‘अमुक अमुक मंदिरातील आरतीच प्रत्यक्ष दर्शन...’

‘ओमसाई राम मेसेज १०० लोकांना पाठवा’

एक दिवस तर मेसेज झळकला -
सावधान तुम्ही कुठलीही Tablet घेतांना खात्री करा,तुमच्या जीवाचा खेळ होतोय’ असा मेसेज होता आणि खाली व्हिडीओ होता,त्यांत एका Tablet वर एक व्यक्ती थोडं पाणी टाकतो आणि त्या Tablet चा पूर्ण पातळ कागद होतो.’

डोक्यालाच हात लावला कारण तो व्हिडिओ ‘Tablet Tissue पेपरचा होता.’

घरातल्या लोकांना साधं वाढदिवसाला तोंडभरून Happy Birthday न म्हणणारी ही मंडळी संकष्टी,महाशिवरात्री,होळी ,रंगपंचमी,दशहरा,दिवाळी,ईद,क्रिसमस,पतेती,संक्रांति,रक्षाबंधन,प्रजासत्ताक दिन ,स्वातंत्र्य दिन....झाडून सगळ्या सण-उत्सवाच्या ते शुभेच्छा देतात.
इथे त्यांना कुठल्याही जाती धर्माचं वावडं नसतं.
आणि सगळ्यात मोठा ....सगळ्यात मोठा शाप न ताप तर ‘शुभ प्रभात ....’, ‘शुभ रात्री’..’शुभ हे ..’ शुभ ते ....
Ohh God…..

झुकेरबर्गा कुठे नेऊन ठेवला जेष्ठ नागरिक माझा?

मला पुन्हा ते पेपरात डोक घालून बसणारे,कट्ट्यावर बसणारे, चुकल्यावर समोरासमोर शाळा घेणारे जेष्ठ, प्रेमाने चिवडा,लाडू करणाऱ्या,वाती वळत चुगल्या करून झाल्यावर
‘जाऊदे मरो आपल्याला काय करायचं य...देव बघून घेईल’ म्हणणाऱ्या म्हाताऱ्या हव्या आहेत.
देवा त्यांच्या हातात स्मार्टफोन येऊ दे पण त्यात त्यांचा पूर्वीचा चौकसपणा हरवू देऊ नको.
फालतू टीव्ही सीरिअलने आधीच त्यांच्या वेळ फुकट घातला आहे त्यात ही अजून एक भर नको.......
© Givinghappinesss.

Marathi Jokes by Harshada : 111613086

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now