आपल्या प्राणप्रिय आयुष्य आणि आरोग्य वाढविण्याकरता आपणही करक चतुर्थी व्रत अवश्य करायला हवं !!!!अगदी श्रद्धा भक्तीने करा!!! जिद्दीने करा..!!

हे करक चतुर्थी व्रत भारतीय धर्ममय आर्य महिलांना अखंड सौभाग्य प्रदान करणारे आहे... विवाहित महिलांनी या दिवशी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य आणि स्वस्थ आरोग्य राहण्यासाठी मंगल कामना करून हे व्रत नक्की

हे व्रत सौभाग्यवती महिला आणि नवीन झालेल्या अविवाहित मुलींनी केले पाहिजे ..हे व्रत आश्‍विन वद्य चतुर्थीला केल्या जातं.  सकाळीच स्नानादी नित्यकर्मे करून "मनसुख स्वभाग्य सुस्थिर श्री प्राप्त करक चतुर्थी व्रत महम करिष्"असा संकल्प करून पांढऱ्या मातीची किंवा वाळूची वेदी म्हणजे चौकोनी ओटा बनवावा.. त्याच्यावर रांगोळीने पिंपळाचा वृक्ष काढावा.. त्या वृक्षाच्या खाली शिवपार्वती आणि भगवान कार्तिकेय यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.. नंतर नमः शिवाय म्हणून शंकराचं आणि कार्तिकेय स्वामींचं पूजन करावं ..त्यानंतर रव्याचा लाडू किंवा शिरा करून तो नैवेद्य दाखवा  ..दिवसभर निर्जला व्रत करावे.. रात्री चंद्राला अर्घ्य  द्यावे ..म्हणजेच जल चंदन अक्षदा पुष्प फळ दक्षिणा आणि नारळ इत्यादी अर्पण करावं.. आपल्या पतीचे पूजन करून आशीर्वाद घ्यावा.. त्यानंतरच तेरा रव्याचे लाडू एक तांब्या पाकाने भरलेला एक घट आणि काही वस्त्र पतीच्या आई-वडिलांना म्हणजेच आपल्या सासू-सासऱ्यांना द्यावीत त्यांच्या पाया पडावं.. नंतर उपवास सोडावा...✍️✍️💞 Archu💞

या व्रता संबंधी दोन कथा आहेत..
जेव्हा पांडव वनात राहत होते, तेव्हा अर्जुन तपश्चर्या करण्यासाठी इंद्रणील पर्वताकडे गेली होती.. त्यांना जाऊन फार दिवस झाले ...पण ते काही माघारी आले नाही..आपले पती न आल्यामुळे द्रोपदी चिंतेत पडली.. ती चिंता जाणूनच श्रीकृष्णाने तेथे येऊन तिला करक चतुर्थी व्रत करण्यास सांगितले ..आणि या व्रताविषयी जी कथा शंकरणि पार्वती ला सांगितली होती ...तीच कथा श्री कृष्णाने द्रौपदीला पण सांगितली होती..
ती कथा अशाप्रकारे आहे..
शाखाप्रस्थ नगरात देव शर्मा नावाचा एक ब्राह्मण आपल्या परिवारासहित राहत होता ..त्याला सात पुत्र आणि एक कन्या होती ..तिचं नाव वीरवती होतं ..तिचा विवाह सुदर्शन नावाच्या ब्राह्मण हा बरोबर झाला होता ..ब्राह्मणाच्या सर्व पुत्रांचा विवाह झालेला होता ..एकदा वीरवती माहेरी आली होती व तिच्या भावाजया यांनी करक चतुर्थी व्रत विधिपूर्वक केलं   परंतु वीरवती दिवसभर निर्जला राहून भूक सहन करू शकली नाही ..भुकेने व्याकूळ होऊन हात पाय गळून ती खाली बसली.. तिच्या भावांनी बहिणीची बिकट परिस्थिती आपल्या पत्नीला पुढे व्यक्त केली.. त्या म्हणाल्या वीरवती तर भुकेने अत्यंत पीडित आहे.. परंतु ती हे व्रत चंद्र दर्शन करून सोडणार ,यांची गोष्ट ऐकून बंधूंनी शेतात जाऊन पिंपळाच्या आडून टेंभी आदींचा प्रकाश करून चंद्र ऊदयाचा दृष्य बनवलं आणि वीरवतिला चंद्र उदय होण्याचं ते दृश्य दाखवण्यात आलं..विर्वतीने त्या चंद्रालाच अर्घ्य देऊन जेवण केलं ..
नकली चंद्रमाला आर्घ्य दिल्याने  व्रत खंडित झालं ..त्यामुळे तिचा पती अचानक आजारी पडला.. पुष्कळसे उपाय करूनही तो ठीक झाला नाही व तिला फार चिंता झाली...

एक वेळेस इंद्राची पत्नी इंद्राणी करक चतुर्थी व्रत करण्याकरता पृथ्वीवर आलेली आहे ...हे ऐकून विरवातिने तिच्या जवळ जाऊन प्रार्थना केली.. "हे इंद्राणी ,हे माते मी तुम्हाला नमस्कार करते.. तुम्ही मला माझा पती स्वस्थ होण्याचा उपाय सांगा "...!!
इंद्राणी म्हणाली" तुझ्याकडून करक चतुर्थी व्रत खंडित झाल्यामुळे तुझ्या पतीची ही दशा झाली आहे!! जर तू करकचतुर्थी व्रत खंडित न होता विधिविधान पूर्वक पूर्ण करशील.. तर तुझा पती ठीक होईल !!"
वीरवतीने विधिविधान पूर्वक सांगोपांग करक चतुर्थी व्रताचे पालन केलं ..फलस्वरूप तिचा पती पूर्ण रूपाने स्वस्त झाला

नेहमीच तुमच्याशी आपलं नातं समजून व्यक्त होणारी तुमच्या-आमच्या मधील, ✍️✍️💞Archu💞

Marathi Motivational by Archana Rahul Mate Patil : 111600365

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now