वर्षभरात खरं तर अनेक पौर्णिमा असतात.. पण ह्या शरद पौर्णिमेचे महत्त्व काही वेगळेच आहे.. ही पौर्णिमा अत्यंत शुभ मानले जाते.. यावर्षीची पौर्णीमा 30 ऑक्टोबर 2020 शुक्रवारी आहे.. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात.. धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की लक्ष्मी या पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर येते.. शरद पौर्णिमेच्या रात्री झोपण्यास मनाई असते... या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात.. किंवा काही ठिकाणी जागृत रात्र असेही म्हटले जाते.. या दिवशी विष्णू सहित माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येते आणि कोजागर्ती कोजागर्ती म्हणजेच कोण जागे आहे असे म्हणत पुढे चालत राहते... ज्यांच्या घरी रात्रभर पूजाअर्चा करून रात्र जागून काढल्या जाते त्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होते असे म्हटले जाते..👣

या पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र प्रकाशामध्ये दुधाची खीर बनवल्या जाती व रात्रभर त्या चंद्रप्रकाशाने दुधामध्ये पडणारे किरणांना अमृत असे संबोधले आहे.. आजारी व्यक्ती किंवा सर्वांनाच प्रसाद म्हणून याचे सेवन केले जाते.. शास्त्रानुसार चंद्राची किरणे ही या दुधा मध्ये पडत असताना अमृतासमान मानले आहे.. या दिवशी सायंकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाची पूजा करून तेथे दीप ही प्रज्वलित केल्या जातो.. या दिवशी श्री विष्णुसहस्त्रनाम किंवा श्रीकृष्णांचे कृष्णा अष्टक आणि मधुराष्टक पाठ असलेले अत्यंत उपायकारक आहे... ही वाचल्याने आर्थिक संपत्ती, समृद्धी तथा मनःशांती मिळते..

पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीला पाणी घालावे ..तिच्यासमोर दिवा प्रज्वलित करावा..तसेच सायंकाळच्या वेळी ही तुळशीसमोर दीप प्रज्वलित करुन लक्ष्मी मातेचे आवाहन करणारा मंत्र म्हणावा.. आपल्या घरात देवी लक्ष्मीचे स्वागत करणारे प्रसन्न वातावरण ठेवा.. माता लक्ष्मीला सुपारी खूप प्रिय आहे पूजेमध्ये तिचा समावेश नक्की असावा.. लाल धागा अक्षद कुमकुम श्रीफळ इत्यादींनी पूजा करून या वस्तू पुन्हा लक्ष्मीपूजनासाठी तिजोरी ठेवावी...👣

माझ्या माहेरी आडगाव ला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आठ ते बारा कीर्तन असते.. त्यानंतर नाम कीर्तनाचा गजर होतो.. सगळेच गावकरी मंडळी राधाकृष्ण मंदिरात जमा होत..प्रत्येक जण आपापल्या घरून जेवढे असेल तेवढे दूध घेऊन येतो.. तेथे सर्व दूध एकत्र करून ते तापवण्यासाठी एका मोठ्या चुलीवर ठेवले जाते ..मंदिराच्या प्रांगणात भलेमोठे स्वयंपाकगृह आहे ,तेथे उघड्यावर चूल मांडून चंद्रप्रकाशात त्या दुधाची खीर बनवली जाते.. गावकऱ्यांना पुरून उरेल इतपत मोठ मोठे पातेले किंवा कड्या तेथे असतात.. किर्तन संपता-संपता रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान हे दूध सर्व गावकऱ्यांना वाटले जाते.. प्रसाद म्हणून सगळेच ते ग्रहण करतात.. खूपच अतिउत्साही असा हा सण तेथे साजरा केला जातो.. गावकऱ्यांचा उत्साह खूपच असतो.. कोजागिरी पौर्णिमे नंतरच कार्तिक स्नान ची सुरुवात होते.. दुसर्‍या दिवशी सकाळपासून काकडा चालू होतो.. संपूर्ण महिनाभर कार्तिक स्नान करून काकडा घेतात... तुमच्याकडे ही पौर्णिमा कशी साजरी केली जाती??? हे मला कमेंट मधून नक्की कळवा !!!!!

तुमच्या-आमच्या मधील 💞💞

✍️✍️💞Archu💞

Marathi Motivational by Archana Rahul Mate Patil : 111600347

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now