शेक्सपियर बोलला की नावात काय आहे? पण आजच्या घडीला रंगात काय आहे? अस बोलायची नितांत गरज आहे. बरं रंगच नाही तर एखाद्याच्या शरीरावर खोचकपणे बोलणे जास्तच वाढले आहे. तू जाडा, लुकडा, काळा, पांढरा आणि जाती बद्दल तर ना बोललेल बर. माणूस कसाही असला तरी त्याच शरीर हे तुझ्या सारखच आहे ना हाडामासाच, त्याच रक्त सुध्दा लालाच आहे की तुझ्या रक्ता सारखं. मग कशाला खोचक टीका करतोस? का त्याच्या वर्णावर टीका करतोस? अरे त्याला वाटत का त्याने काळी त्वचा घेऊन जन्माला यावं? ते त्याचा हातात नाही मग तू का टोचून बोलतोस का तर तू गोरा पण कर्म तर तुझे डांबरा पेक्षा जास्त काळे आहेत ते बघ आधी. त्याची जात खालचीवरची आहे मान्य पण जात काढली कोणी अश्मयुगीन काळातील पुराव्यावर तर जातीचा काही उल्लेख नाही मग कुठून आल्या? तुझ्या सारख्या गलिच्छ बुद्धीतून च निर्माण झालेली सर्वात घातक गोष्ट आहे ही. असो पण कोणाच्या जातीवर, शरीरावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर बोलण्याआधी तो कोणत्याही गोष्टीत स्वतःपेक्षा काकणभर सरस आहे हे लक्ष्यात यायला हवं.

Marathi Whatsapp-Status by Ajay Shelke : 111591631

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now