कित्येकदा खूप काही बोलायचं असत पण ती व्यक्ती जेव्हा समोर येते तेव्हा अगदी वाचा बसते. जसं जन्मतः मुके असल्या प्रमाणे अगदी चिडीचूप होऊन जातो आपण. माहित नाही का होत अस पण तो काय विचार करेल हा विचार आपण करतो आणि गप्प बसतो. भीती असते मनात की त्याला काय वाटेल पण आपल्याला काय वाटतं आहे हे सांगत नाही आणि वेळ निघून जाते. त्यामुळे मनात असत ना ते बोलून टाकायचं अगदी बेधडक कारण काय आहे जर आज हिम्मत करून नाही बोललो तर पुढे आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते आणि तीच वेळ येऊ नये. तो काय विचार करेल हा स्वतः करू नये ते त्या व्यक्तीवर सोडायला हवं. त्याचा निर्णय काही असो पण उद्या मनात ही खदखद नको की आपल बोलायचं राहून गेलं. म्हणुन मन मोकळेपणाने बोलायला सुरुवात करायला हवी कारण उद्याचा दिवस त्या विधात्या शिवाय कोणी बघीतलेला नाही.

Marathi Motivational by Ajay Shelke : 111589664

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now