दोघांमधले अंतर किती आहे ह्यावर प्रेम अवलंबून नसते. प्रेमात तो/ती किती लांब आहे महिन्यातून किती वेळा भेट होते, सोबत किती वेळ व्यतीत होतो हे महत्त्वाचे नसते. लांब असून नात्यात किती एकता आहे, एकमेकांची ओढ आहे हे महत्त्वाचे ठरते. एकमेकांवरील विश्वास हे लांबच्या नात्याचा कणा असून सर्व खेळ हा विश्वासावर टिकून असतो. एकमेकांवर किती विश्वास आहे आणि किती पारदर्शीपणा आहे हे महत्वाचे ठरते. लांब असून एकमेकांसाठी पूरक वेळ देणे, लांब असून एकमेकांची काळजी घेणे, दुःखात लांब असून सोबत राहणे. लांबचे नाते टिकवणे तितके अवघड नाही की तितके सोप्पे सुद्धा नाही पण आपल्या जोडीदारावर विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा असेल तर साता समुद्रापार असून सुद्धा प्रेम करता येत आणि ते टिकून शेवटाला घेऊन जाता येते.

Marathi Blog by Ajay Shelke : 111577620

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now