फार फार तर एक ते दीड महिना असते IPL पण आपल्या आवडत्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि पाठींबा दर्शवताना लोक खूपच खालच्या थराला जाऊन इतर संघाची किंवा त्यातील खेळाडूची अक्षरशः त्याच्या अब्रूची वरात काढतात पण तोच खेळाडू उद्या त्या निळया कपड्यात ज्यावर INDIA लिहिलेलं असत ते घालून आपल्या देशाला प्रतिनिधित्व किंवा दर्शवणार आहे. तोच खेळाडू उद्या देशासाठी खेळणार आहे हे मात्र लक्षात येत नाही. इतर देशांमध्ये सुध्दा अनेक आंतरिक सामने होतात मात्र कधी खेळाडूंची अब्रू चव्हाट्यावर आणत नाही तेथील समर्थक. खेळात हार जीत तर होतच असते सांगण्याचा हेतू एवढाच की ज्या खेळाडूची किंवा व्यक्तीची अब्रू चव्हाट्यावर काढण्या आधी तो आपल्या देशातील आणि देशाला दर्शवणारा एक व्यक्ती असून त्याची अब्रू वेशीवर टांगणीला लावणे म्हणजे देशाची अब्रू काढणेच होय. संघ कोणताही असो मात्र त्यातील खेळाडू हे देशातील नागरिक असून आपले बांधव आहेत हे विसरू नये एवढीच इच्छा.

Marathi Thought by Ajay Shelke : 111576088

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now