काहींनी खळखळून हसायला शिकवलं
काहींनी दुःख विसरायला शिकवलं
काहींनी भरभरून जगायला शिकवलं
काहींनी जग बघायला शिकवलं.

काहींनी अपमान पचवायला शिकवलं.
काहींनी ताठ मानेने विरोध करायला शिकवलं
काहींनी वेळेमुळे स्वतःला बदललं
काहींनी स्वभावामुळे वेळेला बदललं.

काहींनी खूप गोड आठवणी दिल्या
काहींनी थोड्या कडू जाणिवा
पण त्या गोड आठवणी आठवून
समोरच्याला माफ करायला ही त्यांच्यामुळेच उमगलं

प्रत्येक जण शिक्षक आहे माझ्या आयुष्यात
कारण शिकवलं तर प्रत्येकाने मला
कुणी आईबाबा बनून, कुणी शिक्षक बनून
कुणी मित्र बनून तर कुणी अनोळखी बनून

असतात उणीवा प्रत्येकात
कडू आठवणी मनाच्या कुपीत बंद करून ,
चांगल्या आठवणींना जागा मोकळी देणं सुद्धा
त्यांच्यातल्याच काहींनी शिकवलं

# Happy_Teachers_Day...!
.....To all and every person who teaches me every second....

Marathi Poem by Smile : 111562037

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now