आत्ममिलन

बदन कि सरहद पार कर,
रुह़ तक जो पोहोचता ।
सात फेरो का रीश्ता ऐसा हो,
तो आत्ममिलन है कहलाता ।

'लग्न केल्याशिवाय आयुष्याला पूर्णत्व लाभत नाही....."
माझ्यासाठी जेंव्हा स्थळ आल आणि मी लग्नाला नकार दिला, हेच वाक्य मला माझ्या घरी दिवसरात्र ऐकू यायचे. शेवटी त्या वाक्याला कंटाळून मी लग्नाला होकार दिला आणि झालं एकदाच 'सावधान'.....तेंव्हा 'लग्न' या गोष्टीच गांभीर्य नाही कळाल मला, पण आज खरच वाटतं की लग्न आयुष्याला परिपूर्णता देण्यासाठी एवढं गरजेचं आहे का...?? कदाचित असेलही.... पण काही मंत्रोच्चार आणि समाज मान्यता ह्या गोष्टी पुरेश्या आहेत का दोन अनोळखी व्यक्तींना सोबत राहण्यासाठी ??? एक मुलगी म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी 'हो' असच देणार, कारण हेच तर शिकवतात ना आम्हाला की एका मुलीसाठी तिचा पतीच सर्वकाही असतो....केलं हेही मान्य.... एका जीवनसाथी पेक्षा जास्त साथ आपल्याला कोणीच देत नाही....पण मग पुरुषांचं काय???? ते मानतात आपल्या पत्नीला आपलं सर्वकाही??? यावर काही भाष्य केलं तर आपल्या भारतीय संस्कृतीला ते मान्य होणार नाही आणि तो वादाचा विषय होऊन जाईल.... तरीही त्याबद्दल थोडस माझा अभिप्राय देण्याचं दुःसाहस करत आहे.....

"संपूर्ण स्त्री एका पुरूषाला कधीच मिळत नाही".....अमृता प्रितम यांच हे मत...त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या, कविता, लेख वाचलेत पण ही ओळ माञ लक्षात राहीली... कारण त्याचा अर्थ कळला नव्हता ना... खूप नासमझ होती मी जेंव्हा हे वाचल होतं... आता मात्र त्याचा संदर्भ लागतो आहे मला की का अस मत असावं त्यांच.... जेंव्हा दोन जीव लग्न बंधनात अडकतात तेंव्हा ते एकमेकांना सर्वस्वी समर्पित असतात....खरच असतात ना?? मनाच्या समाधानासाठी होकारार्थी उत्तर देऊ शकतो याच...पण मला नाही वाटत हे खरं आहे....जर एका पुरुषाला 'संपूर्ण' स्त्री हवी असेल तर त्याने तिचा स्विकार केवळ तिच्या शरीरानेच नाही तर तिला तिच्या आवड, निवड, आचार, विचार, मत, दुमत यासगळ्यांसकट केला पाहिजे...जर ती स्त्री शरीरानेच त्याची असेल आणि पण तिच्या मनात तिच्या विचारात त्याच स्थान नसेल  तर त्या पुरुषाइतका दुर्दैवी कोणी नाही....हे माझं परखड मत आहे...

पण मग हे फक्त पुरुष्यांच्याच बाबतीत का???? नाही....नक्कीच नाही...जर लग्न दोन व्यक्तींचं असतं, तर ते नातं निभावण्यात समर्पण ही दोघांचं सारखच लागतं... जर एक स्त्री आपल्या जीवनसाथीच्या व्यथा समजू शकत नसेल, त्याला हवा तो मानसिक आधार देऊ शकत नसेल तर त्या स्त्री इतकं दूर्भाग्य कोणाचं नाही....त्यामुळे जर खरच 'लग्न' नावाची संज्ञा सत्यात उतरवायची असेल तर आधी एकमेकांना मनापासून स्वीकारायला शिका...कारण जेंव्हा अश्याप्रकारच 'आत्ममिलन' दोन जीवांच होतं तिथे 'देहमीलन' ही केवळ औपचरिकता असते.......

--------------------------------------------------------------
समाप्त.

Marathi Thought by अनु... : 111550738

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now