तळहात काय सांगते ?

तळहातावर ज्या विविध रेषा आहेत ते माणसाच्या वयानुसार बदलत राहतात. उजव्या हातात कैचीसारख्या रेषा दिसल्या तर पूर्वज म्हणायचे याच्या हातात कधीच पैसा राहणार नाही. जसा येईल तसा जाईल. काहीजणांच्या बाबतीत ते सत्य ही ठरते. हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगणारे काही भेटतात. त्यांचा अभ्यास गाढा असेल तर नक्की आपल्या हातात काय आहे ते सांगू शकतील. एका हाताचे पाच बोट आहेत. प्रत्येक बोटावर तीन आडव्या रेषा मारलेल्या आहेत. गणिती क्रिया करतांना बेरीज असो किंवा वजाबाकी त्यावेळी ह्या रेषा मोजून गणित करत असत. हाताच्याची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी ह्या रेषा खूप कामाला येतात. तळहाताच्या संदर्भांत एक वाक्य आठवते, आई-बाबांनी आपल्या मुलांची तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली म्हणजे खूप काळजी घेतली असा त्याचा अर्थ होतो. तळहात आपला नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो. उजव्या हाताने आपण जेवण करतो म्हणून जेवण्यापूर्वी तो हात स्वच्छ धुतले पाहिजे. सध्या कोरोना संकट आपल्या सभोवती घोंगावत असल्याने बाहेरून आले की वीस सेकंद आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे असा मौलिक सल्ला सारेच जण देत आहेत आणि आपण देखील त्याचे अनुपालन करत आहोत. तळहात खूप नाजूक असते. साधं सुई जरी टोचली तर वेदना व्हायला सुरुवात होते. म्हणूनच त्याची आपण जास्त काळजी घेतो. क्रिकेट खेळताना तळहाताला इजा होऊ नये म्हणून ग्लोव्हज वापरतात. डॉक्टर मंडळी देखील कोणतेही व्हायरस तळहाताला चिकटू नये म्हणून पातळ ग्लोव्हज वापरत असतात. आपल्या शरीराची जशी काळजी घेतोय तशीच काळजी तळहाताची देखील घ्यायला हवी, दुर्लक्ष करून चालणार नाही.
- नासा येवतीकर

Marathi Good Morning by Na Sa Yeotikar : 111500941

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now