BALCONY

“बाल्कनी” .. आपल्या घरातील एक अशी जागा जी सर्वांच्या आवडीची आणि अख्या घरात प्रत्येकाला एकांत देणारी .. जेव्हा कोणी आपलं नवीन घर घेत तेव्हा कुतूहल असत ते बाल्कनीच ..ती हवेशीर .. सूर्यप्रकाश देणारी असेल , मोठी असेल.. वगैरे वगैरे ..मग त्याचबरोबर आपण ती सजवायची कशी ह्याची स्वप्ने आपण पाहू लागतो. .. बाल्कनीतून मिळणार व्ह्यू हा हि आपल्या कुतूहलाचा विषय असतो. तर अशी ही बाल्कनी आपल्या घरातल्या प्रत्येकाची हक्काची जागा असते ..सकाळी चहाचा आस्वाद घेता घेता पक्ष्यांची किलबिल ,गार वारा , आजुबाजुच्या बाल्कनीत दिसणारे आपल्या शेजारच्यांचे चेहेरे हा अनुभव हीच देऊ शकते ..त्यातच आपण बाल्कनीत फुलवलेली छोटीशी बाग मनाला ताजी तवानी करते . कधी थकून घरातल्या गोंगाटापासून शांतता हवी असेल तर हक्काची जागा म्हणजे बाल्कनी , ही आपल्या कितीतरी सुख दुःख्खाची साक्षीदार असते .. ऑफिसची टेन्शन्स ..आयुष्यातील ताण तणाव फोनवर एकांतात बोलण्यासाठी हिचा उपयोग आपण सर्वच करतो ..घरातील तरुण मुला मुलींना आपले पर्सनल फोन तर बाल्कनीतच अटेंड करायचे असतात “नेटवर्क विक” आहे ह्या कारणाने ( हे कारण खर की खोटं हे त्यांनाच माहीत) कधी घरातील जेष्ट्य मंडळी जी बाहेर जाउन मोकळी हवा व निसर्गाचा आनंद घेऊ शकत नाहीत ती बाल्कनीलाच आपलं गार्डन आणि तिथे ठेवलेल्या खुर्च्या म्हणजे त्यांचे बेंच मानतात त्यात बाल्कनीत जर झोपाळा असेल तर अजून काय हवं ! ..लहानपणी आम्हाला स्टडी टेबल घालून दिल जायचं ते बाल्कनीत एकतर घरातील इतर जागा वाचली जायची आणि तिथे “एकांतात अभ्यास” होईल असं आई बाबाना वाटायचं पण जस जस मोठ व्हायचो तस अभ्यासाबरोबर दुसऱ्यांच्या बाल्कनीत बघण्याची सवय ही लागायची ते वयच तस असत .. बाल्कनीला आपलं पहिल्या प्रेमापासून ते आपल्या आयुष्यातील कितीतरी गोष्टीच साक्षीदार आपण बनवतो आपल्या ही नकळत ..
बाल्कनीतला मंद प्रकाशाचा दिवा ..कधी ठेवलेला फिश टॅंक विंडचिंमचा मंजुळ नाद अश्या गोष्टींनी आपली बाल्कनी सजते आपल्या घराची शोभा वाढवते तसच बाल्कनीत आपण घालवलेली खास अशी संध्याकाळ , बाहेर धो धो पडणाऱ्या पावसाचा आनंद अश्या कितीतरी आठवणींचा साठा आपल्याला हीच देते ,कधी कधी तर आपल्या घरातील अडगळीच्या सामानाला जागा देऊन ती आपल्यावर उपकारच करते.. अशी ती बाल्कनी आमच्या लहानपणी ६ ते जास्तीत जास्त ८ माजले उंच असणारी आता मात्र २३ काय २५ काय उंचच होत चाललीय ..आणि मग अचानक एक दिवस त्या उंच बाल्कनीतून घरातील कोणी व्यक्ती जीव देते तेव्हा तिला प्रचंड धक्का बसतो ..तेव्हा तिला वाटत की जीव देणाऱ्या त्या जीवाला माझी जागा इतकी अपुरी पडावी कि त्याला आपल्या कुटुंबातील निदान एका व्यक्ती बरोबर बाल्कनीत येऊन संवाद साधता आला नाही ..

Writer ,
Suchita Sawant

Marathi Blog by Suchita Sawant : 111475928

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now