#पात्र
मराठी भाषा आहे ही, एकाच शब्दाचे कितीतरी अर्थ असणारी ही समृद्ध अशी भाषा आहे! आता हाच शब्द घ्या की पात्र, या एका शब्दाच्या उच्चाराने वेगवेगळ्या व्यक्तींच्या मनात वेगवेगळा अर्थ येऊ शकतो म्हणजेच मराठीत फक्त तो शब्द उपयोगाचा नाही तर तो शब्द कोणत्या संदर्भात आलेला आहे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.
उदाहरण म्हणून खालील वर्णन वाचा...
"पात्रता असूनही त्याला डावलले गेल्याने तो विरक्त होऊन गंगा किनारी गेली कित्येक दिवस रहात होता. आता गंगा नदीच्या त्या विशाल पात्राकडे पाहून त्याला आपण किती शूद्र आहोत याची प्रथमच जाणीव झाली. त्याने तिथेच किनाऱ्यावर बैठक ठोकली आणि हातातले भिक्षापात्र समोर ठेवले. समोरच्या बाजूला विद्यार्थ्यांचे एक पथनाट्य चालू होते. गंगा नदीच्या प्रदूषणावर आधारित त्या पथनाट्यातले प्रत्येक पात्र जीव तोडून गंगामय्याच्या स्वच्छतेचा संदेश देत होते.थोडे पलीकडे एक युवक आपल्या प्रेमपात्राला बाहुपाशात घेऊन तिच्याशी लगट करत बसला होता.बाजूने जाणारे येणारे त्यांच्या त्या उघड्यावरच्या शृंगाराचे नयनसुख घेत होते... '
बघा इथे 'पात्र' हा एकच शब्द; पण किती वेगवेगळ्या संदर्भात वापरला गेला आहे...
अशी माझी मराठी भाषा, एक समृद्ध बोली!
©प्रल्हाद दुधाळ, पुणे 9423012020.

Marathi Thought by Pralhad K Dudhal : 111467231

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now