#####good afternoon !
##मच्छिंद्रमाळीऔरंगाबाद
##आनंद_मराठी विभाग.

" #आनंद - एक मानसिक अवस्था "
------------------------------------------------
🌸🌸 मन (mind) 🌸🌸

मनुष्य ज्याप्रमाणे जीवन जगतो अगदी त्याच पध्दतीने त्याचे कार्य असते मनात निर्माण होणारा शब्द देखील हा एक ब्रम्ह आहे मनुष्याच्या तोडांतून बाहेर पडलेला शब्द हा मनुष्याच्या जिभेच्या वर असलेल्या पोकळीत (जे बाहेरआहे आपण त्याला आकाश म्हणतो तीच पोकळी मनुष्याच्या शरीरात देखील आहे) तोडांतुन बाहेर पडलेला बोल आदी आकाशात घुमतो नंतर तो शब्द आपणांस ऐकू येतो त्याच बोलाने या ब्रम्हांडाचा व्यवहार चालतो !एखाद्या मनुष्याने ज्या पध्दतीने बोल ब्रम्ह निर्माण केले त्यामुळेच या सृष्टीत अनेक भाषा आहेत त्याने त्याच्या पासुन उत्पन्न झालेल्या मनुष्याला तेच ब्रम्ह शिकवले त्या मनुष्याने जे त्याच्या ओळखीत उतरले त्या त्या पध्दतीने बोलाची भाषा निर्माण केली त्याने ज्या पध्दतीने जाणले तेच त्याने आपल्या ब्रम्हांडात निर्माण केले आणि हे ब्रम्हांड निर्माण करणाऱ्या व्यक्तीला सद्गुरु म्हणतात असा व्यक्ती ज्याला त्याने निर्माण केलेल्या ब्रम्हांडाचे संपुर्ण सत्य प्रत्यक्षात अनुभवाने आत्मसात केलेली असते त्याच्या ब्रम्हांड काय काय निर्माण केले तेच सद्गुरु अनेक ब्रम्हांडाचे धरतीवर असणाऱ्या अनेक भाषा वेशात चालीरिती वागणुक मनुष्य संस्कृती निर्माण करण्यासाठी सद्गुरुंना दिवसरात्र मनुष्याला समजून सांगावे लागते असे अनंत कोटी ब्रम्हांड या विश्वात आहे पण त्या त्या ब्रम्हांडात सद्गुरु ही वेगवेगळे जरी असले तरी सुक्ष्म शरीर धारण करुन प्रत्यक्षात ब्रम्हांडा व्यवहार सुरळीत निर्माण करण्यासाठी देहगावाची निर्मिती केली चावडी निर्माण केली तेथे मनाजीराव कोतवाल झाले संपूर्ण सृष्टीचा कारभार चालविण्यासाठी मनाला अनेक रुपे धारण करुन प्रत्येक व्यवहार ध्यान केंद्रित करावे लागले देहगावाचा पाटीलाने केलेल्या नियमाने मनाला मनाकडे घेऊन जाणारा मार्ग त्रिपुटी मध्ये सद्गुरुंना विराजमान व्हावे लागले त्यांनी निर्माण केलेल्या ब्रम्हांडाचे ज्ञान मनाने अनेक सुक्ष्म धारण केले तरी सद्गुरु विना त्याला मनाकडून कोणतेही बोलब्रम्ह प्राप्त होत नाही तो मनुष्य कोठेही रममान झाला तरी त्याला ठराविक बोलाने जागवण्याचे काम हे सद्गुरु करतात मना कडून मानाकडे पाहिल्यानंतर अनेक भ्रममय ब्रम्हांड मोडीत काढून त्याला योग्यता नुसार कार्य सोपवून त्यांच्याकडून कार्य करुन घेतात म्हणून या सृष्टीतील प्रत्येक जीवाने आपला जीव ब्रम्हमयमनुष्याला साभांळ्यास दिला ब्रम्हांड मनुष्याच्या मनाने निर्माण होत असल्यामुळे त्या ब्रम्हांडात अनेक शक्तिशाली शक्ती ग्रहण करण्या आगोदरच भ्रमाच्या कल्पित दुनियेत फसत त्रीपुटीत बसलेल्या सद्गुरुंचे म्हणणे ऐकायला येत नाही भ्रमात असल्यामुळे मीच ब्रम्ह असल्याने सत्य उलगडा होत नाही. त्याला मनाकडून मनाकडे कसे जायचे याचे जर ज्ञान झाले तर त्याचे मन #आनंदाने_ओथंबुन जाते म्हणजेच मन ब्रम्ह##आनंदी लीन होऊन जाते. त्यालाच मनाची ##ब्रम्हानंदावस्था असे म्हणतात. ज्याला अमाप असलेल्या शक्तीचा उपभोग घेता येत नाही त्यामुळे कष्टाला सामोरे जावे लागते मुळ न समजल्या त्याला या सृष्टीत रममान झालेल्या मायेचे बंधने तोडून सुध्दा #आनंद_मार्ग त्याला मिळत नाही अन मानसिक दुःखावस्थेला सामोरे जावे लागते.सद्गुरुंनं प्रपंच करुन ब्रम्हांड निर्माण केलं मनुष्य मात्र प्रपंच सोडून आपल्या मनाने भ्रामक कल्पीत दुनियेत फिरत राहतो मात्र त्याला त्या ब्रम्हांड नायकाला भेटायला मार्ग सापडत नाही !!

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111417962
Nandita Dalvi 4 years ago

खूप छान

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now