एक दिवस मोबाईल शिवाय...
मोबाईल..काळाची गरजच झालीये.. पण मोबाईल फक्त गरज न राहता व्यसन कधी झाला ते माझ मलाच कळल नाही. आता माझ्यासाठी भयंकर अवघड गोष्ट आहे मोबाईल शिवाय राहाण. मला तर विचार पण करता येणार नाही. “मोबाईल शिवाय मी कशी राहीन..?” सध्याचा फार मोठा प्रश्न आहे माझ्याकरता!!! प्रश्न कसला,चिंतेचा विषय! आता स्मार्ट फोन आलेत आणि आता स्मार्ट फोन आलेत म्हणजे हातात मोबाईल इंटरनेट. इंटरनेट म्हणजे नुसत गुगल नाही....गमेल आहे,गेम्स आहेत..काय हव ते मिळत इंटरनेट वर. फेसबुक आहे..फेसबुक वर रोज चक्कर टाकली नाही तर बचैन होत मला. फेसबुक वर जायचं...तिथे गेल कि वेळ कसा जातो कळतच नाही! आणि त्यात आता भर पडलीये ती म्हणजे whatsapp, wechat ची...सगळ्या मित्र मैत्रिणींशी संपर्क ठेवण एकदम सोप्पा झालाय. तिथे पहिली पासूनचे मित्र...एक मित्र गेला कि दुसरा येतो...हे दिवसभर चालूच असत आणि मी मोबाईल वर दिवसभर बिझी असते. माझा लक्ष सारख मोबाईल कडेच असत. गम्मत म्हणजे,आता जे हवाय ते सगळ फक्त एका क्लीक वर मिळतंय. स्मार्ट फोन आल्यापासून मला एक सवय लागलीये,(अर्थात हि सवय चांगली नाहीये पण मी सवयीच्या अधीन झालीये...) आधी माझा दिवस देवाला नमस्कार करून चालू ह्यायचा पण आता देव कुठेतरी कोपऱ्यात असतो..एकटाच बसलेला!! त्याच्याकडे पहायलाही मला वेळ नसतो... आता उठले कि आधी मी मेल किंवा मित्र मैत्रिणीचे मेसेज पाहते. त्यांनी माझा दिवस चालू होतो. कधी कुणाचा मेसेज आला नसेल तर मी भयंकर अस्वस्थ होते. कोणाचा मेसेज आला नसेल तर मी भर भर सगळ्यांना हाय चे मेसेज करून मोकळी होते. जेणेकरून संवाद चालू राहावा. संवादाची मला इतकी सवय झालीये कि त्याच्याशिवाय मला चैनच पडत नाही. सगळ किती विचित्र झालाय!
मला कळतंय,सगळ्याचा अतिरेक होतोय, आणि काश्याचाही अतिरेक वाईट अस म्हणतात...मला कळतंय पण वळत नाहीये,मी अतिरेक करतीये!! माझ मोबाईल च व्यसन किती वाढलाय ह्याचा विचार देखील मला करवत नाहिये आता. खरच मला आठवत पण नाहीये,मी मोकळेपणानी आई,बाबा,आज्जी,आजोबा यांच्याशी शेवटच कधी बोललीये. माझ्या लक्षत येतंय ,घरातल्यांशी संवाद कुठेतरी हरवत चाललाय.. आणि स्वत:साठी वेळ देण तर मी पूर्णपणे विसरूनच गेलीये. आता मात्र माझे डोळे उघडले आहेत!! बस फार झाल हे इंटरनेट च व्यसन!! आता मला प्रकर्षानी अस वाटतंय, माझ मोबाईल च व्यसन हे कुठेतरी कमी झालाच पाहिजे. जितकी गरज तितकाच वापर. मी असाही प्रयत्न करणरे,आठवड्यात नाही पण महिन्यातला एखादा दिवस तरी मोबाईल शिवाय घालवायचा. जेव्हा शक्य आहे तेव्हा मोबाईल ब्रेक घ्यायचा. अवघड आहे पण प्रयत्न नक्कीच करणार!!! मोबाईल माझ्या साठी आहे पण मी मोबाईल साठी नाही!! प्रयत्न केला तर नक्की जमेल!! आता फक्त पाहायचं,किती जमतंय..,लेटस होप फोर द बेस्ट!!!

Marathi Good Morning by Anuja Kulkarni : 111354972
Rutvika Patil 4 years ago

Jevha kadhi implementation hoil tevha kharach manapasun anand hoil....

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now