जीवनाचा हा कठीण प्रवास

जिच्या साथीने सुखकर व्हावा

अशी एक सोबती असावी



सुखात सोबत असेल

आणि दुःखात सामील असेल

अशी एक सोबती असावी



उगाचच आपल्याकडे हट्ट करणारी

हक्काने आपल्यावर रुसणारी

अशी एक सोबती असावी



समोर असतां तिच्याकडेच पाहावं

समोर नसता तिच्या आठवणीत रमावं

अशी एक सोबती असावी



लटके -झटके आणि नखरा करावा

त्यावर आपला जीव ओवाळून टाकावा

अशी एक सोबती असावी



जिच्या नसण्याने उदास व्हावं

असण्याने आयुष्य पूर्ण वाटावे

अशी एक सोबती असावी



नात्यांचं गणित पक्क माहिती असलेली

आणि त्याच गणिताचे फॉर्मुले शिकवणारी

अशी एक सोबती असावी



स्वतःच वेगळं अस्तित्व जपणारी

तरीही आपल्यात तिचं अस्तित्व शोधणारी

अशी एक सोबती असावी



प्रसंगी कणखर कठीण रागीट

पण तेवढंच गोड कौतुक करणारी

अशी एक सोबती असावी



जगण्याची एक वेगळीच नशा

जिच्या सोबत अनुभवता यावी

अशी एक सोबती असावी

Marathi Poem by Pravin Gaikwad : 111346692
Nandita Dalvi 4 years ago

छान लेखन

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now