पुन्हा नवी पाहाट आहे

प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर

जगण्याचे हे गणित आहे

प्रत्येक प्रश्नाला आहे उत्तर

तू सावर स्वतःला



घेऊनि जगण्याची नवी आशा

आणि जीवनाची नवी परिभाषा

नवी उमंग अन नवा श्वास

स्वतःवर तू कर विश्वास

तू शोध स्वतःला



भूतकाळाचे तोडुनी पाश

भविष्याची घेऊनि आस

स्वप्न नवे अन नवा ध्यास

नवचैतन्याचा पुन्हा उल्हास

तू समज स्वतःला



जगण्याला तू दे आव्हान

ऊठ पुन्हा तू हो तैयार

कितीही अवघड असेल रस्ता

करायचा आहे तुला तो पार

तू चेतव स्वतःला

Marathi Poem by Pravin Gaikwad : 111346690

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now