इतक्या दिवस तुझा हात
माझ्या हातात होता
तुझा श्वास माझ्या श्वासात होता
माझा जीव तुझ्यात होता
तुझं मन माझ्या सोबत होत
तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता..

पहिली भेट बस स्टाप वर झाली होती.
आपली ओळख हळूहळू झाली होती
  तुझी माझी मैत्री होत चालली होती
  अचानक झालेल्या मैत्रीची सुरुवात
  प्रेमाच्या रुपात झाली होती..

  तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....

तुझी हकीकत तू मला सारखं
  आठवण करून देत राहिली...
माझी खासियत तू एक बनवून
  तुझा हिस्सा हृदयात ठोके देऊ
  लागली...

  तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....
 
  तुझी नजर माझ्यावर खिळली होती..
   माझी काया कुडी माया मोह आवरता
   घेत होती...
    तुझा स्पर्श मिलनात भरभरून साथ
     देत होती..
     दुसऱ्या मुलींमध्ये तु मला दिसतं होती

तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....

   तुझं ज्या दिवशी लग्न ठरलं
    मला आत्ता कळून चुकलं
    तुझं स्वप्न पाहणं सोडून दिलं
    तु तुझ्या संसारात सुखी राहा
    एवढचं माझं अश्रू सांगत राहिलं

तुझा जीव कुठं माझ्यात होता
शेवटी तु मला एकटा जीव
  सदाशिव केला होता....
   
   शेवटी तु माझी नाही
    मी शेवटी तुझा नाही
   आयुष्य कुणाचं खेळणं नाही
   जीवनात कुणाची भावना दुखावली नाहीं
   असंच आपलं आपल्या दोघांच्यात
    उरल्या फक्त आठवणी त्या कधी
    शब्दांत मांडु शकतं नाहीं माझं
    दुःख कुणाला सांगून उपयोग नाहीं
        तुझा जानू
        तूं माझी पिलू....


 
 

Marathi Poem by UMESH : 111239785

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now