####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*ॐ अ भं ग - सं तां ची ॐ*

" पांडुरंग हरि !!"??
रक्षाबंधनाच्या हार्दिक
शुभेच्छा !!????

भाव तोची देव
आणि देव तोची भाव,
संकटी रक्षण करण्या
जो समर्थ एकमेव.

भक्तिच्या बंधनात बांधुन
त्यास आपुला करा,
प्रेमे अर्पून भलेही चिंधी
सुखाचा आश्रय धरा.

भावाचा भुकेला तो तर
भुले न आणि कोणा,
होईल तुमचा दास तो जरी
जाता अनन्य शरणा.

पहा पुराणी ऐसी ख्याती
दौपदीस रक्षिले,
एका चिंधीचे ऋण देवे
सहस्त्र पटी फेडीले.

स्वार्थाच्या आहारी जाऊन
अंती होईल हानी,
भाव देव हा मंत्र सुखाचा
विसरु नका कोणी.
(जनाची गाथा)
जनार्दन राऊत महाराज निरोमचे.

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111237005

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now