###भक्तीरंग
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
???राम कृष्ण हरी???
*** इश्वर प्राप्ती ***
--------------------------
.... || श्रीहरी || ....

ज्या #परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचय ज्या परमात्म्यापर्यंत आपल्या सर्वांना जायचय त्याचा परिचय होनही तेवढच महत्त्वाच आहे.
#साधुसंत त्या ठिकाणी परमात्म्याला जाणून परमात्म्याची भक्ती करीत होते. आपण ही परमात्म्याची भक्ती करीत आहोत पण बऱ्याच वेळेला परमात्म्याला न जाणताच परमात्म्याची भक्ती करतो आहोत,
परमात्म्याला #जानन महत्त्वाच आहे.
परमात्म्याच #दर्शन होण वेगळ आणि परमात्म्याला #जानन वेगळं, परमात्म्याला जाणायचचं असेल तर गरज आहे #ज्ञानाची आणि परमात्म्याला पहायचं असेल त्याचे दर्शन घडायच असेल तर गरज आहे #भक्तीची म्हणून #भक्ती आणि #ज्ञान या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.

परमात्मा #सच्चिदानंद स्वरूप आहे.
परमात्मा #सत्य आहे, परमात्मा #चैतन्य स्वरूप आहे, आणि परमात्मा #आनंदस्वरूप आहे .
#सत्य_चैतन्य_आणि_आनंद ही तीनही भगवंताची स्वरूप आहेत.
ज्याचा तीनी कालात #बाद होत नाही त्याला #सत्य म्हणतात,
परमात्मा एक #सत्य आहे त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरं काहीही सत्य नाही, म्हणून तर काल ही तोच सत्य होता आजही तोच सत्य आहे आणि उद्याही तोच सत्य राहणार आहे आणि त्याच्या वाचून सत्य जगात दुसरं कोणच नाही.

|| #सत्य_तु_सत्य_तु_सत्य_तु_विठ्ठला ||

#चैतन्य त्याला म्हणावं जे स्वतःलाही जाणत जे दुसर्‍यालाही प्रकाशीत करु शकत.
#चैतन्य स्वरूप कोण असेल तर #परमात्मा आहे.

परमात्मा #आनंद स्वरुप आहे परमात्म्यावाचून आनंद जगात कोणत्याच ठिकाणी नाही.

- श्रीगुरूमाऊली

•॥ राम कृष्ण हरी ॥•

Marathi Religious by मच्छिंद्र माळी : 111210837

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now