परिस्थिती -: प्रेरणादायी

परिस्थितीसम शिक्षक नाही
इथे शिकलेले व्यर्थ न जाई
पसरावे पाय जितकी रजई
जाणीव परिस्थिती करून देई.

ती एकच परी रंग किती वेगळे
खडतर कधी तर पाश कधी मोकळे
कुणी धनवान कुणी हात पसरे
हुशारीही हार मानते परिस्थितीमुळे.

निमित्त बनते कधीकधी परिस्थिती
आपल्याच करणीचा सार परिस्थिती
जबाबदार मनुष्य ना टाळे परिस्थिती
प्रयत्न करा मग बदलतेच परिस्थिती

© संजय स गुरव (सदासन)

Marathi Poem by Sanjay Gurav : 111164509

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now