म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी .......
सृष्टीचे सृजन माझ्या अंगी
म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी

मुक्या भावनांना शब्द देते मी
अबोल स्वप्नांची भाषा डोळ्यात जागवते मी
म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी

निराकार आकार घेतो माझ्यात
वंशबीज उदरी नऊ मास
जन्म देण्यास जोपासते माझ्यात
म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी

मीच माता मीच गृहिणी
मीच अर्धांगीनी मीच कुलवधु
विश्वास मी , प्रेमाची अबोल
निःस्वार्थ परिभाषा मी
म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी

मायेची ऊब माझ्या हृदयी
अंगी सप्तसुर संगीत प्रपंचाचे
भावनांची हळवी कोंब पालवी
मीच सखी सावली माझी
भान राखत आयुष्याची
मर्यादा जपत सार्थ जन्माची
म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी
©दिपाली प्रल्हाद
#kavita #Kavyotsav2 #Kavyotsav2 #womenempowerment #poem #marathikavita #kavita #poetry #love #kavita #marathipost #कवी #कविता #मराठीकविता #मराठीअस्मिता #महाराष्ट्रमाझा #काव्य #लेख #प्रेम #आयुष्य #मराठीप्रेम #आयुष्य #काव्यांजली #marathi

Marathi Poem by Dipaali Pralhad : 111159166

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now