प्रत्येक माणसाला दोन मने असतात. आपलं अर्धसुप्त मन सकारात्मक आणि नकारात्मक भावनांमधून निवड करत नसत तर ते सखोल आणि उथळ भावनांमधून निवड करीत असत. बहुतेक लोक नकारात्मक भांवनांमध्ये नकळत गढून जातात. कारण सकारात्मक विचारपेक्षा नकारात्मक विचार आपले लक्ष वेधून घेतात. किंबहुना लहान असल्यापासून आपल्याला तेच आढळतं. आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आपल्या विचारांवर सरळ परिणाम होत असतो.

लहान मूल घरात आनंदाने खेळत असत, आणि बाकीचे सारे आपल्या कामात व्यस्त असतात. त्यावेळी त्या मुलाच्या खेळण्याकडे कुणाचं लक्ष जात नाही ,पण जर खेळता खेळता त्या मुलाला काही लागलं, दुखापत झाली तर ते मूल रडायला सुरवात करतं , त्याचवेळी सगळे त्याच्याकडे धाव घेतात " काय झालं?" म्हणून. म्हणजे आपल्या नकळत आपल्या त्या मुलाच्या अर्धसुप्त मनावर हे बिंबवत असतो कि   त्याच रडणं त्याच्या आनंदापेक्षा जास्त लक्ष वेधून घेत, परिणामी काही काळानंतर आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ते मूल कोणत्या न कोणत्या प्रकारे रडू लागत, हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी आकांडतांडव करत.  आता त्याच अस वागणं इतरांना जरी विचित्र वाटत असलं तरी त्याला ते बरोबर च वाटतं. कारण त्याच्या अंतर्मनावर नकळत हेच कोरल्या गेलं कि लक्ष वेधून घ्यायचं.. आणि त्यानुसार त्याला जे योग्य वाटलं ते तो करत गेला.

म्हणून एखादी गोष्ट घडून गेली असेल तर त्यावर जास्त विचार करू नका. त्या गोष्टी चा नकारात्मक पगडा तुमच्या सुप्त मनावर होऊ देऊ नका. अपयशातून जे शिकून घाययच ते शिकवण घ्या आणि विसरून जा. तुमचं छोटं छोटा
यश साजर करा. त्या सुखमध्ये तल्लीन होऊन जा.एवढं कि नकारात्मक विचार तुमच्या मनातही यायला नको.
पण हे करायचं कस???
यावर उत्तर म्हणजे नकारात्मक गोष्ट असेल तर त्यावर फार तर फार 2 वाक्य बोला, आणि सकारात्मक असेल तर त्यावर 10 वाक्य बोला, तुमच्या मनाला कळू द्या तुमचा सर्वोतोपरी कल हा सकारात्मक ते कडेच आहे.
नकारात्मकते साठी अगदी कंजूष बना, मोजून मापून शब्द वापरा, पण सकारात्मक विचारांना मिठी मारून आलिंगन द्या, त्यांना बहरू द्या, हेच परिवर्तन आहे.


कोणीतरी म्हटलं आहे, दुःखी मन सर्वात सुंदर काव्य करत, मग या अनुषंगाने देवाने जेव्हा हि सुंदर पृथ्वी निर्माण केली तेव्हा तो खूप दुःखी असला पाहिजे.
पण जो हे बोलला त्याअर्थी तो ईश्वराला समजलाच नाही. प्रसन्नतेचा तळ गाठा, तुम्हाला कुठल्या काव्याची कवितेची गरजच भासणार नाही,  तुमच्यातून च काव्य बाहेर येईल..... तुमचं जीवनच काव्य बनून जाईल.....

Marathi Blog by Tejal Apale : 111053704
D K 5 years ago

खूपच छान

Tejal Apale 5 years ago

खूप छान अभिप्राय सर

Tushar Bachhav 5 years ago

जीवन खरंच काव्य बनून जाईल, डोळ्यातली माळ आनंदाश्रु बनून वाहील.

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now