#LoveYouMummy
प्रिय आईस,
आज तुझ्यापासून मी कितीही दूर असले तरी तू माझ्या जवळपास असल्याचा भास होत असतो. कारण प्रत्येक गोष्टीतून तू दिलेले संस्कार, ममता, माया, निःस्वार्थ प्रेम पाण्यातले प्रतिबिंब प्रमाणे मला माझ्या कृती शैलीतून स्पष्ट दिसून येतात. हे सर्व तुझ्या संस्काराचे श्रेय आहे. "आईविना भिकारी " म्हणतात ते खरंच आहे. माझ्या व्यथांच्या जखमांना ममतेच्या फुंकरने शीतल करून, संस्काराच्या फुलोऱ्यात माझ्या जीवनाला फुलवून, विशाल मनाच्या सागरात माझ्या छोट्या-मोठ्या अपराधांचे शल्य लपवून मला लहानपणापासून आजपर्यंत क्षमाची आणि आधाराची मोठी साथ दिलीस. मी सुखात असो, दुःखात असो, अडचणीत असो त्यावेळी तुझ्या आठवणींच्या सावलीत सुद्धा तू माझ्या जवळ असते. पाठीवर वात्सल्याने हात फिरवते, ममतेच्या पदराखाली घेऊन विसावा देते. तुझ्या कुशीत सारे ब्रह्माण्ड सामावून जाते. कशी तुला मी विसरू-----? " म्हणून सदा मी हेच गाणं गुणगुणत असते " आई तुझी आठवणं येते------ “
तुझी लाडकी,
शोभा.

Marathi Blog by Shobhana N. Karanth : 111043494

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now