#LoveYouMummy मातृभूमी.. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला.. सागरा प्राण तळमळला..’ सावरकर.. किती, काय काय सहन केले या देशभक्तांनी.. यांच्या बलिदानाने तुझ्या पारतंत्राच्या शृंखला तुटल्या पण मिळाले का स्वातंत्र्य.. आताही तू भ्रष्टाचार, आतंकवाद, बेरोजगारी, महागाई या कधीही न तुटणा-या शृंखलेतच श्वास घेत आहेस. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.. तुझे स्थान काय आहे याची सगळ्यांना परत परत का म्हणून आठवण करून द्यावी लागते.. तुला ‘सोने के चिडिया’ म्हणून गौरविले जायचे.. आता फक्त घोटाळे, अपराध यांचे व्रण खोलवर शिरलेत.. वेदनेने तू तडफडत आहेस.. पण हे बंध लाथाडून आता तुला उठायचे आहे.. विश्वस्वरूपी जगधारिणी.. संकटी तारिणी तू.. या प्रलयंकारी तांडवा नंतर सृजनातुनी रंग भरणार आहेस तू.

Marathi Blog by Suchita Ghorpade : 111043320

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now