#kavyotsav
तू आणि मी ..

‘तू आणि मी’
अजूनही न कळलेलं नात
प्रेम-मैत्री परीघेत
सतत फिरणार पात

मैत्रीच्या पल्याड पण
प्रेमाच्या अलीकडच
नात तुझ - माझ
जणू कस्तुरी अन मृगाच

तू सुगंधी रातराणी
स्वच्छंदपणे रातीत फुलणारी
कवडसे मी चांदण्याची किरणे
तुझे सौंदर्य वाढवणारी

हो तू शुक्राची चांदणी
वा हो समुद्राचा किनारा
भरकटलेला मी एक प्रवासी
शोधतो तुझ्यातच सहारा

Marathi Shayri by Omkar Mirzapure : 111035247

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now