*प्रेम*

खरचं प्रेम म्हणजे प्रेम
आणि तुमचं आमचं सेम असतं तर ...
वृद्धाश्रमात टाकलेल्या आई बापाला प्रेमासाठी रडावं लागलं नसतं...

प्रेम तुमच आमचं सेम असतं तर एकतर्फी प्रेमाने जीव देणा-या प्रेमी युगुलांना अर्धवट आयुष्याला मुकावं लागलं नसतं...

प्रेम म्हणजे प्रेम आणि खरच
तुमचं आमचं सेम असतं तर...
इस्टेटी साठी रक्ताच्या त्या नात्याला गळा दाबून मरावं 
लागलं नसतं....

प्रेम तुमचं आमचं सेम असतं
तर....
राखी च्या हातात 
चाकू,सुरी ,कोयत्याला 
धरावं लागलं नसतं..

प्रेम म्हणजे प्रेम असतं
अनं तुमचं आमचं सेम असतं 
तर....
अडाणी माझ्या आया बहिणींना 
ब भ म न पासून दूर रहावं लागलं 
नसतं...

प्रेम म्हणजे प्रेम
अन तुमचं आमचं सेम असतं 
तर....
कृष्ण पेंद्या च्या मैत्रीचं उदाहरण 
कुणाला द्यावं लागलं नसतं....

प्रेम म्हणजे प्रेम 
तुमचं आमचं सेम असतं तर 
राग ,लोभ ,मत्सर विसरून 
उच निच भेद विसरून
जात पात सारं विसरून
एकतेने समाजात वावरता आलं असतं...
जर प्रेम तुमचं आमचं सेम असतं.

सौ.माधवी महेश पोफळे.

Marathi Shayri by Madhavi Mahesh Pophale : 111033068
ravindra shinde 6 years ago

खरंच छान कविता लिहिली माधवी mam. आजकाल प्रेमाची व्याख्याच लोकांनी बदलून टाकली. लोकांचे फक्त पैशांवर प्रेम आहे, जन्मदाते, भाऊ बहीण, नातेवाईक, मित्र यांना फक्त कामापुरते वापरायला लागले लोकं. समाजात घडणाऱ्या घटना आपण रोज दूरदर्शन वर बघतो. माणूस माणुसकी शून्य होत चालला. आपण खरोखर वास्तव कविता लिहिली. अभिनंदन आपले

Arun V Deshpande 6 years ago

माधवी- नमस्कार, छान लिहिलंय.

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now