#Kavyotsav
ठीणगी

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

ना कशाचा रंग होता

ना कशाचा ढंग होता

तुझ्या रंगा - ढंगाने तुच मला रंगविलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

होतो मी भोळा - भाबडा

कशालाच कधी गेला नव्हता तडा

त्या सा-यांचा तु भंग केलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

विसरुन जाव म्हटल सार सगळ

जगाव म्हटल थोड वेगळ

पण भुल तु मला न्यारीच घातलीस

विझणा-या ठीणगीला तुच पेटविलीस

पेटत नसतानाही सांग का पेटविलीसॽ

- परशुराम माळी

Marathi Shayri by parashuram  mali : 111032196

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now